राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला

0 15
नवी दिल्ली –   राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांची  दिल्लीमधील शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. आज संध्याकाळी ५. ३० च्या सुमारास ही भेट होणार आहे. उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही पहिलीच भेट आहे.

उदयनराजे आणि शरद पवारांची ही भेट नेमकी कोणत्या कारणास्तव होत आहे याची अद्याप माहिती मिळालेली नाही  मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

उदयनराजे यांच्या भेटी नंतर नाना पटोले म्हणाले जस्ट वेट अँड वॉच 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेसचे हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटी साठी गेल्या असता तेव्हा सुध्दा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर भाजपा खासदार उदयनराजे भोसले आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट झाली होती. या भेटी नंतर नाना पटोले यांनी वेट अँड वॉच पुढे आश्चर्यकारक धक्के देऊ अशी प्रतिकिया दिली होती .

Related Posts
1 of 1,321

राज्यपाल काही भाजपचे नाहीत ते महाराष्ट्राचे आहेत – संजय राऊत

मात्र  उदयनराजेंना पटोले बाहेर दिसले. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवून त्यांची भेट घेतली व प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलं, असं उदयनराजे यांनी एक वर्तमानपत्राला बोलताना म्हटलं आहे.

नाना पटोले यांना फक्त प्रदेशाध्यक्ष पद तर विधानसभा अध्यक्षपदासाठी थोपटेंचं नाव चर्चेत ?

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: