दोन युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या, आकस्मिक मृत्यूची नोंद

0 253
  श्रीगोंदा  –  श्रीगोंदा तालुक्यातील सिद्धार्थनगर तसेच श्रीगोंदा फॅक्टरी या ठिकाणी दोन युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील रवींद्र रामभाऊ ससाने वय 32 वर्ष यांनी राहते घराचे लोखंडी पाइपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच सिद्धार्थ नगर श्रीगोंदा कुणाल रवींद्र घोडके वय 22 वर्ष याने राहते घराचे लोखंडी अँगल ला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून दोन्ही इसमांच्या मृत्यूचे अद्याप कारण समजू शकले नाही.
 मात्र याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस सखोल चौकशी करत असल्याची माहिती मिळत आहे पोलीस स्टेशनचे सपोनि दिलीप तेजनकर आणि पोना खारतोडे, सफौ. भैलुमे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोना खारतोडे, सफौ. भैलुमे हे करीत आहेत. मात्र या बाबत तालुक्यातून वेगवेगळ्या चर्चा ऐकण्यास मिळत असून श्रीगोंदा पोलीस लवकरात लवकर छडा लावतील अशी आशा सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होताना दिसत आहे.
Related Posts
1 of 1,487
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: