हत्याराने मारहाण करुन दरोडे घालणारे दोन सराईत आरोपीना अटक

0 166

अहमदनगर –    रात्रीचे वेळी घराचे दरवाजे तोडून हत्याराने मारहाण करुन दरोडे ( robbing) घालणारे दोन सराईत आरोपीना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून अटक केली आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने चार चोरीचे मोटार सायकल देखील आपल्या ताब्यात घेतले असून जावेद उर्फ जहिर घड्याळ्या चव्हाण आणि महावीर घड्याळ्या चव्हाण या आरोपीना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार  १८ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री सरिता सुनिल निवडूंगे, (वय ३१ वर्षे, रा. सुपा शिवार, ता. पारनेर) ह्या त्यांचे कुटूंबासह घरामध्ये झोपलेले असताना अनोळखी आरोपींनी  सरिता यांचे घराचा लोखंडी जाळीचा सेफ्टी दरवाजा कटावनीचे सहायाने तोडून व लाकडी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश करुन घरातील लोकांना लोखंडी कटावनी व गजाने मारहाण करुन कपाटामधील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा एकूण ७८,०००/-रु. कि. चा ऐवज दरोडा टाकून चोरून नेला होता. सदर घटनेबाबत सुपा पो.स्टे. येथे गुरनं. ३२६/२०२१ भादवि कलम ३९५, ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर,  उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग तसेच पोनि/अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी सदरचा गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून घटनास्थळाचे निरीक्षण करुन फिर्यादी व साक्षीदार यांचेकडून आरोपींची माहिती घेतली. त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर सदर गुन्ह्याचे तपासकामी स्वतंत्र पथक नेमून आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्याने त्याप्रमाणे पोनि/अनिल कटके यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमले.

पथकातील अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपींची माहिती घेत असताना पोनि/अनिल कटके यांना गुप्त खवऱ्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा जावेद चव्हाण व महावीर चव्हाण, दोघे रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा यांनी व त्यांचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील सपोनि/सोमनाथ दिवटे, सफी/नानेकर, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, भाऊसाहेब काळे, संदीप पवार, पोना/शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ/सागर ससाणे, मयूर गायकवाड, रोहित येमूल, जालिंदर माने, प्रकाश वाघ, रविन्द्र घुंगासे, मेघराज कोल्हे अशांनी मिळून आरोपीचे ठावठिकाणाबाबत गोपनिय माहिती घेवून सापळा लावून आरोपी नामे जावेद उर्फ जहिर घड्याळ्या चव्हाण, (वय- २५ वर्षे, रा. सुरेगांव, ता. श्रीगोंदा)  महावीर घड्याळ्या चव्हाण, (वय २१ वर्षे, रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा) यांना सुरेगाव शिवारातील डोंगरामधून पाठलाग करुन ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे वरील नमुद गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे आणखी कोठे कोठे गुन्हे केलेले आहेत याबाबत कसून चौकशी केली असता आरोपी जावेद उर्फ जहिर घड्याळ्या चव्हाण याने गुंडेगाव, ता. नगर, राळेगण थेरपाळ, ता. पारनेर, यवत, ता. दाँड या ठिकाणाहून यापूर्वी चार मोटार सायकल चोरी केल्या असल्याची माहिती दिल्याने सदर मोटार सायकल चोरी बाबत संबधीत पो.स्टे. ला दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत खात्री केली असता आरोपीने चोरी केलेल्या मोटार सायकलबाबत खालील प्रमाणे गुन्हे दाखल असून मोटार सायकल चोरीचे एकूण ३ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

Related Posts
1 of 1,481

हे पण पहा – बॅलन्स सीट जुळल्यानंतर पालकमंत्री जिल्ह्यात येतील | खासदार विखेंचा घणाघात

आरोपींना मुद्देमालासह सुपा पो.स्टे. ला हजर करण्यात आले असून पुढील कार्यवाही सुपा पो.स्टे. करीत आहेत. सदरची कारवाई  मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अहमदनगर,  सौरभकुमार अग्रवाल , अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व  अजित पाटील उपविभागीय पोलीस अधीकारी, नगर ग्रामीण विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

हसन मुश्रीफ यांची जागा कोण घेणार , पाटील की तनपुरे ,कोण होणार पालकमंत्री

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: