कार्तिकी सोहळयाला निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत भीषण अपघात, 2 जणांचा मृत्यू

0 233
 पुणे –  कार्तिकी एकादशीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये भीषण अपघात (Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. ही दिंडी मावळ (Maval) तालुक्यातून निघाली होती. या आपघातामध्ये दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर १८ वारकरी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.  मिळालेल्या माहितीनुसार खालापूर येथून ही पायी दिंडी आळंदीला निघाली होती, तेव्हा कान्हे फाटा येथे सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे.(Two persons were killed in a tragic accident in Dindigul on the way to Karthiki festival)
मिळालेल्या माहितीनुसार  खालापूर येथून पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत अचानक भरधाव पिक अप गाडी शिरल्याने हा अपघात झाला. या अपघातात सविता वाळकू येरभ (वय 58), रा. उंबरे, रायगड व जयश्री आत्माराम पवार (वय 54), रा.भूतवली, जि रायगड या वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वडगाव-मावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिक-अप चालकाला ताब्यात घेतले आहे. जखमी वारकऱ्यांवर कामशेतच्या महावीर हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत.
Related Posts
1 of 1,603

 गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही केलं ट्विट

या भीषण अपघतानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्थानिक पोलिस प्रशासनाला जखमींवर तातडीने उपचारांबाबत निर्देश देण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. “सातेगाव (ता. मावळ) येथे पायी आळंदीला जाणाऱ्या पालखीमध्ये भरधाव टेम्पो घुसल्याने १५ ते २० वारकरी जखमी झाले व २ वारकऱ्यांचा उपचारांदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहसंवेदना! जखमींवर तातडीने उपचारांबाबत स्थानिक पोलिस प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. (Two persons were killed in a tragic accident in Dindigul on the way to Karthiki festival)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: