कर्जत राशीन रस्त्यावर मोटारसायकल आणि टँकर च्या अपघातात दोन जण ठार

0 10

 अहमदनगर –  कर्जत राशीन रस्त्यावर मोटारसायकल आणि टँकर च्या अपघातात दोघे जण ठार झाले आहेत.या मार्गावरील तालुक्यातील बेनवडी शिवारात सदर अपघात घडला असून टँकर चालक पळून गेला आहे.पोलिसांनी अनिल माऊलकर वय ४३ रा चिलवडी ता कर्जत यांच्या फिर्यादीवरून सदर अपघात प्रकरणी टँकर चालकांवर गुन्हा दाखल केला आहे .

 

या अपघाता बाबत अधिक वृत्त असे आजीनाथ माऊलकर (वय ३८) व प्रताप शिंदे (वय ३७ )दोघे रा चिलवडी ता कर्जत हे कर्जत येथे न्यायालयीन कामकाजासाठी कर्जतला आले होते ते काम आटोपून काल दुपारी कर्जत राशीन रस्त्याने राशीनच्या दिशेने मोटारसायकलवर  (एम एच ४२/एबी९८७६)जात असताना त्यांना समोरून भरधाव वेगाने कर्जतच्या दिशेने येणाऱ्या टँकर ची (एम एच १२/एम एक्स१९५६)ने समोरून जोरदार धडक दिली.

Related Posts
1 of 1,301
यामध्ये आजीनाथ माऊलकर व  प्रताप शिंदे हे गंभीर जखमी झाले.त्यांना उपचारासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले.  हा अपघात काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कर्जत राशीन रोडवर बेनवडी शिवारात झाला. कर्जत तालुक्यातील चिलवडी येथील दोन युवकांचे अपघातात निधन झाले आहे हे वृत्त समजताच ग्रामस्थांनी चिलवडी येथील सर्व व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली.

धक्कादायक! सरपण तोडण्याच्या वादावरून विवाहितेस डिझेल टाकून पेटवून दिले

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: