दोन तास काम उर्वरीत वेळ आराम…
दोन तास काम व उर्वरीत वेळ आराम हा संदेश अनेकांनी एकमेकांना पाठविण्यास सुरवात केलेली आहे.

नगर : समाज माध्यमावर रोज नवीन अपडेट येत असतात. त्यात सध्या गेल्या काही दिवसांपासून एक मेसेजने धुमाकूळ घातला आहे. दोन तास काम व उर्वरीत वेळ आराम हा संदेश अनेकांनी एकमेकांना पाठविण्यास सुरवात केलेली आहे. या संदेशाची आता शासकीय कार्यालयासह खासगी कार्यालयातील वरिष्ठांनी दखल घेऊन आराम करणार्यांना शोध घेऊन पायबंद घालणे गरजेचे आहे.
सरकारी काम अन् बारा महिने थांब ही म्हण प्रचलित होती. परंतु कालमानपरत्वे या म्हणीत आता बदल झालेला आहे.
Ramdas Athawale – रामदास आठवले यांचा फडणवीस, विखेंना प्रस्ताव…
कर्मचार्यांना दोनच तास काम अन् बाकीचा वेळ आराम असतो. त्यामुळे कर्मचार्यांना दोन तास कामाच्या वेळेतच ते भेटत असतात. त्यातच सर्वसामान्यांची कामे होत आहे. अशा आराम करणार्या कर्मचार्यांमुळे कार्यालयातील नियमित कामे करणारेही आराम करू लागले आहे तर काहीजण कामचुकारपणा करू लागले आहे. ही परिस्थिती जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांची आहे.
या परिस्थितीमुळे अनेक कार्यालयातील कामे ठप्प झालेली आहे. एकाची सवय दुसर्याला लागली आहे. त्यामुळे फाईलचे ढिगारे साठू लागलेले असून आराम करणार्यांची कामे इतरांना दिली जात आहे. त्यामुळे कार्यालयांमध्ये वादावादीचे प्रसंग घडू लागलेेले आहेत.
आराम करणारे बहाद्दर मात्र वरिष्ठांची कामे करत असल्यामुळे त्यांच्या आरामाची सोयबिनदीक्त होत आहे. आरडाओरड करणार्यांवर अतिरिक्त भार टाकला जात असून काहींना इतर कामे सोपविली जात आहे. असे प्रकार सध्या काही सरकारी-निमसरकारी कार्यालयासह खासगी कार्यालयांमध्ये सर्रास सुरु आहे. यामुळे अनेक कार्यालयात सध्या कर्मचार्यांमध्ये वादावादी सुरु असल्याची चर्चा होत आहे.