लोखारा येथे शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू …….

0 244
  श्रीगोंदा  :-   श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्याच्या सीमेवर लोखारा (ता कर्जत) येथील मावळे वस्ती वरील दोन मुलांचा शेत तळ्यात पोव्हायला गेले असता दुर्दैवी मृत्यु झाला.हरी नामदेव कोकरे वय वर्ष 15 व विरेंद्र रामा हाके  वय वर्ष 17 हे कोरोना काळातील शाळेला सुट्टी असल्यामुळे शेळ्या चारण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील भवानी माता मंदिराच्या आसपासच्या परिसरात पुणे येथील रहिवासी चोपडा  यांची शेतजमीन आहे.

त्या जमिनीत शेततळे आहे. त्या मध्ये दुपारी एक, दोन च्या दरम्यान पोव्हायला गेले असता शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न लागल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. पाच ते सडेपाच च्या दरम्यान शेळ्या घरी गेल्या आसता मुले का आली नाहीत या मुळे घरच्यांनी शोध घेतला असता मुलांचे कपडे, चपला,भवानी माता मंदीरा समोर असलेल्या चोपडा यांच्या शेत तळ्याजवळ दिसल्या व त्यातील एक मुलगा पाण्यावर तरंगताना दिसला, त्या नंतर दुसऱ्या मुलाला काढन्यास आंधार पडल्याने आडथळा येत होता परंतु पेडगाव येथील दोण तरुन आसिफ शेख व समीर शेख या दोन मुलांनी पाण्यात बुडी घेऊन रात्री नऊ-साडेनऊ च्या दरम्यान दुसर्या मुलाला ही  बाहेर काढले.
 त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मृतदेह घरी नेले याबाबत पोलीस प्रशासनाला समजले असता दोन्ही मयत मुलाच्या नातेवाईक यांनी आम्हाला कसलीही तक्रार दाखल करायची नाही असे ठामपणे सांगितले मध्यरात्री उशिरा दोन्ही मुलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले या झालेल्या घटने मूळे तेथील परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विक्रीस प्रतिबंध असलेल्या गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू विक्रेत्या विरुध्द जिल्ह्यामध्ये कारवाई

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: