श्रीगोंदा पारगाव रोडवर भांबचा मळ्या जवळ दोन कारचा भीषण अपघात

श्रीगोंदा :- श्रीगोंदा पारगाव रोडवर भांबचा मळ्या जवळ दोन कारचा भीषण अपघात दुपारी 2 च्या सुपारास झाला.
त्या मध्ये होंडा सिटी कंपनीची AURA MH09FV0632 कार व मारुती सुझुकी कंपनीची RITZ MH14BX1903 या कार चा समोरासमोर भीषण अपघात झाला असून, हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा समोरच्या बाजूने चक्काचूर झाला आहे.
एका कारमध्ये चार प्रवासी व दुसर्या कार मध्ये एक प्रवासी असलेली माहिती समजली असून, कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून, पुढील उपचारासाठी श्रीगोंदा येथील हॉस्पिटलमध्ये ॲम्बुलन्स च्या सह्याने नेले असुन, एका कारमधील प्रवासी स्टेट बँक शाखेचे कर्मचारी असल्याचे समजले आहे.