कोकणी पाडा जवळ दोन बसचा भिषण अपघात , 50 प्रवासी किरकोळ जख्मी

0 142

नवी मुंबई –   विक्रमगड तालुक्यातील आलोंडे कोकणी पाडा (Konkani Pada) येथील राईसमील जवळ डहाणू – ठाणे आणि वाडा-जव्हार या दोन बसचा भिषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन्ही बसमधील 50 प्रवासी (passengers) किरकोळ तसेच काही गंभीर जख्मी झाले. हा अपघात आज सकाळी नऊच्या सुमारास झाला. दोन्ही बस एकमेकांच्या समोरासमोर आल्याने त्याच्यात ठोकर होऊन हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Two buses collided near Konkani Pada, injuring 50 passengers)

हे पण पहा – पोलिसांच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलाची आत्महत्या

आज सकाळी 9 च्या सुमारास विक्रमगड वरून वाडा कडे जाणारी डहाणू-ठाणे सातारा तसेच वाडा वरून येणारी जव्हार-वाडा बस कोकणी पाडा येथील राईसमिल जवळ समोरासमोर ठोकर होऊन भिषण अपघात झाला या अपघातात दोन्ही बस मधील जवळ-जवळ 50 प्रवासी गंभीर तसेच किरकोळ जख्मी झाल्याचे या बस मधील प्रवाशानी सांगितले यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना तातडिने वाडा विक्रमगड येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे.  (Two buses collided near Konkani Pada, injuring 50 passengers)

Related Posts
1 of 1,608

संघटीत गुन्हे करणाऱ्या टोळीतील पाच आरोपीविरोधात मोक्का कायदयान्वये कारवाई

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: