DNA मराठी

Ahmadnagar Crime:- तलवारीसह दोघांना अटक…

तलवार, कोयते, गुप्ती बाळगल्या प्रकरणी दोन आरोपींना कोतवाली पोलीसांच्या ताब्यात

0 223

नगर : तलवार, कोयते, गुप्ती बाळगल्या प्रकरणी दोन आरोपींना कोतवाली पोलीसांच्या ताब्यात घेऊन त्यांच्या कपड्यातून शस्त्रसाठा जप्त केला आहे. या
कुणालसिंग कमल सिंग जुन्नी (वय 19 रा. काटवनखंडोबा, अर्शद रशिद शेख (वय 22, रा. इमामवाडा, नविन टिळकरोड दोघे राहणार नगर) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

Surabhi Hospital’s :- सुरभीच्या अडचणीत वाढ…. संरक्षण विभागाचा ना-हरकत दाखला खरा नाही

22 मार्चला कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नगर शहरातील काटवन खंडोबा कमानीचे जवळ टिळकरोड लगत इसमनामे कुणालसिंग कमल सिंग जुन्नी हा हत्यारे बेकायदेशीरपणे बाळगून विक्री करत आहे. आत्ता गेल्यास त्याला पकडता येईल अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांना सदर ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

Related Posts
1 of 2,494

सत्तेच्या नशेत नेत्यांकडून गैर कृत्यांचे प्रकार वाढ, राजकारणात डागाळलेली नेते, तरीही मी तो नव्हेच.

त्यावेळी आरोपीला पकडून त्याची चौकशी केली असता, त्याचे नाव कुणालसिंग कमल सिंग जुन्नी असे सांगून त्याच्याकडे दोन तलवारी, एक कोयता, एक सत्तूर अशी हत्यारे सापडली आहेत. त्याच्याकडे सापडलेली हत्यारे कोठून व कशासाठी आणलेले आहेत. यादिशेने त्याची विचारपूस केली असता ही हत्यारे माझीच असून त्यापैकी एक मोठा कोयता व एक चाकू हा अर्शद रशिद शेख याची असल्याचे कबूल केले. सदर कारवाईबाबत पोलीस जमादार सलीम शेख यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: