DNA मराठी

फेब्रिकेशनचा दुकान फोडणारे दोन आरोपींना अटक ; तोफखाना पोलिसांची कामगिरी

0 183
Young man beaten to death on suspicion of mobile theft; Death of a young man

प्रतिनिधी- DNA मराठी टीम

अहमदनगर –  बोल्हेगाव येथील फेब्रिकेशन दुकान (fabrication shop) फोडणारे दोन आरोपींना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे तर एक आरोपी फरार झाला असून तोफखाना पोलीस त्याचा शोध घेत आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना २५ मार्च पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाकडून देण्यात आली आहे.  या प्रकरणात सुनिल सुखदेव भालेराव यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली होती.

फिर्यादी यांचे फेब्रिकेशन दुकान दत्त मंदिराजवळ, बोल्हेगाव गांधीनगरमध्ये आहे. त्यांनी या दुकानांमध्ये हॉटेलचे जुने सामान ठेवलेले होते. ३ मार्च २०२२ रोजी दुपारच्या १२च्या सुमारास दुकान लॉक करून फिर्यादी घरी गेले असता मात्र फिर्यादी यांना दुकाना शेजारील संतोष सरादे यांनी तुमच्या दुकानाचा मागील दरवाजा तुटलेला आहे तुम्ही तात्काळ दुकानावर या असं फोनवर सांगितले. फिर्यादी जेव्हा दुकानात पोहोचले तेव्हा त्यांना  हॉटेलचे जुने सामान दिसून आले नाही कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुकानामागील रुमचा मागच्या बाजुचा दरवाजा तोडुन रूम मध्ये प्रवेश करुन सामान चोरून नेल्याची तक्रार त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिली होती.
Related Posts
1 of 2,452
गुन्हा दाखल झाल्यानंतर तोफखाना पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी भेट देऊन चोरी झालेल्या ठिकाणी बारकाईने पाहणी केली व पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांना आरोपींना अटक करण्याची सूचना दिली.  पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे या प्रकरणाचा तपास करत असताना तपासामध्ये  अकील पापा भाई शेख उर्फ भुऱ्या (वय ३३) , राजकुमार शिवानंद निसाद (२५) आणि अनिल रामदास घोडके यांनी केल्याची माहिती मिळाली. त्यावरून अकिल याला तोफखाना पोलिसांच्या पथकाने रेल्वे टेशन लोखंडी पुलाजवळ भंगारच्या दुकानांमधून अटक केली. तर राजकुमार याला बोलेगाव येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. तर तिसरा आरोपी अनिल घोडके हा फरार आहे यांनी ही चोरी केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले होते पोलीस आपल्या मागावर आहेत याची त्याला चाहूल लागल्याने तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: