T-20 World Cup सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या दोघांना मुद्देमालासह अटक 

0 106

 नाशिक –   सध्या टी-20 वर्ल्डकप (T-20 World Cup) सुरु आहे.  या वर्ल्डकप मध्ये अनेक जण झटपट पैसे कमाई करण्याच्या नादात सामन्यांवर सट्टा (Betting ) लावतात. मात्र सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांचे  बारीक लक्ष आहे. नाशिक शहरातील उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुराणा हॉस्पिटल चौकात, देवळालीगाव काही जण टी-20 वर्ल्डकपच्या सामन्यात सट्टा लावत होते. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत दोन आरोपीना (Two Arrested) अटक केली असून त्याकडून 5 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Two arrested for betting on T-20 World Cup matches)

मिळालेल्या माहितीनुसार देवळालीगाव येथे वसीम रशीद शेख हा एका दुचाकीवर बसून  वर्ल्डकपमधील साखळी सामन्यावर सट्टा चालवित आहे.  त्यासाठी मोबाइलमधील अॅपवर विकेट, रन आणि स्कोअपर पाहून सट्टेबाजी सुरू असल्याची  माहिती पोलिसांना मिळाली . या माहितीवर पोलिसांनी त्या  ठिकाणी अचानक छापा टाकला. तेव्हा सट्टेबाजी सुरू असल्याचे दिसले.

हे पण पहा – नाशिकच्या ‘ या ‘ भागात बिबट्याचा मुक्त संचार ( पहा व्हिडीओ )

Related Posts
1 of 1,486

पोलिसांनी वसीम रशीद शेख (रा. हरीश्रद्धा सोसायटी, सी विंग, गाडेकर मळा, देवळाली गाव, नाशिकरोड) आणि अमोल शिवाजी नागरे (रा. दत्तनगर, बंधुप्रेम चाळ, पंचवटी, नाशिक) यांना बेड्या ठोकल्या. त्यांनी आपण विजय नंदवाणी याच्या सांगण्यावर कमिशनवर सट्टेबाजी चालवत आहोत. श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सान्यावर मोबाइलमधील अॅपवरून स्कोअर पाहून लोकांकडून पैसे स्वीकारत आहोत आणि हा जुगार सुरू आहे, अशी कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून रोख 3 लाख 48 हजार रुपये, दोन मोबाइल, दोन दुचाकी, एक सट्ट्यांची नोंद असलेली वही असा एकूण 5 लाख 8 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. (Two arrested for betting on T-20 World Cup matches)

चक्क 124 गाढवांची चोरी, गुन्हा दाखल , किंमत ऐकूण पोलीसही चक्रावले

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: