ट्वीटर इंडियाने त्यांची ब्लॉक पॉलिसी नेमकी काय आहे हे जाहीर करावे – नवाब मलिक

0 65

नवी मुंबई   –  ट्वीटर इंडियाने त्यांची ब्लॉक पॉलिसी नेमकी काय आहे हे जाहीर करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. ट्विटरने कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी व कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांची ट्विटर हँडल ब्लॉक केली असून नवाब मलिक यांनी ट्वीटरच्या भूमिकेवर शंका निर्माण केली आहे.

लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराची प्रेयसीने केली हत्या, आरोपीला अटक

मागील काही दिवसापूर्वी ट्वीटर व केंद्रसरकारमध्ये वाद उफाळून आला होता. त्यानंतरच विरोधी पक्षांच्या नेत्यांची ट्वीटर हँडल ब्लॉक होत आहेत आणि हे दबावाखाली होत आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.  कोणत्या गोष्टींसाठी आणि कोणत्या कारणांसाठी हँडल आणि पोस्ट ब्लॉक करणार आहे आणि किती दिवसांसाठी व त्यांच्या कक्षेत जी – जी ट्वीटर हँडल येतील त्या सर्वांवर कारवाई करणार का? याबाबतची पॉलिसी  ट्वीटर इंडियाने स्पष्ट करावी अन्यथा केंद्रसरकारच्या दबावाखाली ट्वीटर काम करतंय ही जनतेची शंका अजून वाढेल असेही नवाब मलिक म्हणाले.(Twitter India should announce what their block policy exactly – Nawab Malik)

Related Posts
1 of 1,512

हे पण पहा –  Ahmednagar Moharram 2021- मोहरमचा  पाचवा दिवस  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: