
प्रतिनिधी DNA मराठी टीम
श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील कुकडीच्या लाभ क्षेत्रातील बारा गावातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न गंभीर झाल्याने नियमानुसार १३२ चारीला कुकडीचे पाणी मिळण्यासाठी दि.५ एप्रिल रोजी सर्व शेतकरी महिला भगिनींना बरोबर घेऊन गेट तोडो आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्रतिभाताई बबनराव पाचपुते यांनी दिला आहे.
यावेळी बातमीदारांशी बोलताना डॉ. प्रतिभाताई बबनराव पाचपुते म्हणाल्या गेली १७ मार्च पासून आज आठरा दिवस झाले. कर्जत व करमाळा तालुक्यात सत्ताधारी आमदारांची मर्जी सांभाळण्यासाठी कुकडी चे आवर्तन चालु आहे. तेथे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत म्हणून जास्त दिवस पाणी आणि श्रीगोंद्यात विरोधी आमदार आहेत म्हणून वेळेवर पाणी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांची टाळाटाळ का राज्यात महाविकास आघाडीचे सहकार आहे, त्यामुळे अधिकारी सत्ताधाऱ्याचे बाहुले झालेत का ?
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही महिला गप्प बसणार नाही. जर अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कुकडीचे आवर्तन तालुक्यातील लिंपणगाव, वेळू, चोराचीवाडी, म्हातारपिंप्री, शिरसगाव बोडखा, लोणी व्यंकनाथ, पारगाव, श्रीगोंदा, बाबुर्डी, बेलवंडी, घारगाव या बारा गावांना पूर्ण दाबाने पाणी सोडून येथील प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे हि आमची प्रमुख मागणी आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळ प्रसंगी जेल मध्ये जाण्याची वेळ आली तरी चालेल आता आम्ही गप्प बसणार नाही. वेळेत पाणी सोडले नाही तर १३२ चारीचे गेट तोडून पाणी तालुक्यातील बारा गावांना देणार असा इशारा डॉ. प्रतिभाताई बबनराव पाचपुते यांनी दिला आहे.