श्रीगोंदयात द्राक्षाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक यासह विविध गावात मोठ्या प्रमाणात उलाढाल झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट सावरले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक यासह आजूबाजूच्या गावात म्हणजे पारगाव सुद्रिक बरोबरच आजुबाजूच्या गावातही द्राक्ष लागवड झाली आहे . यामध्ये पारगाव सह लोणी,बेलवंडी,आढळगाव,हंगेवाडी, घोटवी,श्रीगोदा,चिंभळा,आढळगाव यासह इतर गावात मोठ्या प्रमाणात द्राक्ष लागवडीचे प्रमाण वाढत चालले आहे.
त्यामध्ये द्राक्षे ची सुरुवात आंबट पण शेवट गोड झाल्याने द्राक्षशेतकरी मार्च, एप्रिल मधिल मिळालेल्या दराबद्दल शेतकरी आनंदित झाला आहे त्यात नगर दक्षिण मध्ये पारगाव सुद्रिक या पिकांसाठी, मार्केटिंग साठी केंद्रस्थानी झाल्याने एकट्या पारगाव सुद्रिक ची 100कोटींच्या आसपास उलाढाल झाली आहे दरवर्षी प्रमाणे चालू वर्षी पण यंदाही उत्तरेकडील राज्यांत पारगाव सुद्रिक च्याच द्राक्षे ला मागणी वाढली होती इतर जिल्ह्याच्या तुलनेत सांगली, नाशिक पेक्षाही श्रीगोंदा तालुक्यातील द्राक्षे चा दर्जा उत्तम मिळाल्याने तालुक्यातील द्राक्ष मालाला चांगली बाजारपेठे मिळाली आहे देशासह परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असल्याने शेतकरी मनोमन खुश झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले यातून शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट काही अंशी सावरले आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
मनोगत
दिपक सुपेकर (तालुका कृषी अधिकारी)- तालुक्यातील द्राक्ष शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या पद्धतीने द्राक्षे पिकवतात आणि त्याचा फायदा चांगला दर्जाचे पिक मिळते.
बाप्पु लडकत (द्राक्षे शेतकरी)
सुरुवातीला खराब वातावरणामुळे द्राक्ष दर्जा कमी मिळाला परंतु नंतर तापमान वाढल्यानंतर दर्जा सुधारला आणि मागणी ही वाढली परिणामी शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला त्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले.
राजुशेठ ढवळे (द्राक्षे व्यापारी)
आम्ही राज्यभरातुन द्राक्षे घेतो त्याबरोबरच पारगाव सुद्रिक चेही द्राक्ष आम्ही घेतो या परिसरातील द्राक्ष दर्जा आणि टिकाऊपणा यामुळे बाहेरील राज्यातून मागणी जास्त असते.