IPL मॅचवरून जेलमध्ये तुफान राडा; एका कैद्यानं फोडला दुसऱ्याचा डोळा अन्..

0 374
Tufan Radha in jail after IPL match; One prisoner broke the other's eye and ..
प्रतिनिधी DNA मराठी टीम 
मुंबई – नुकताच २६ मार्च पासून आयपीएलचा १५ व्या (IPL 2022) सिझन सुरु झाला आहे. यावेळी आयपीएलमध्ये ८ ऐवजी १० संघ सहभागी झाले आहे.  आयपीएल केवळ देशात नाहीतर संपूर्ण जगात क्रिकेटचे चाहते पाहतात.  भारतात तर आयपीएलचे चाहते खूप आहे. हे चाहते आपल्या संघासाठी काहीपण करू शकतात याचे तुम्ही सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ पहिले असेल मात्र उत्तर प्रदेशातील जेलमध्ये (Uttar Pradesh) एक वेगळीच घटना समोर आली आहे. IPL मॅचवरून जेलमध्ये कैदी भिडले. एकमेकांच्या जीवावर उठले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Tufan Radha in jail after IPL match; One prisoner broke the other’s eye and ..)
Related Posts
1 of 2,480
उत्तर प्रदेशातील जेलमध्ये आयपीएल मॅचवरून तुफान राडा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील महोबा जिल्हा कारागृहात (Mahoba Jail) आयपीएल मॅच पाहण्यावरून कैद्यांमध्ये भांडण झाले. त्यावेळी एका कैद्याने दुसऱ्याला जोरदार मारहाण केली. मारहाणीत एका कैद्याचा डोळाच फोडला आहे. जखमी कैद्याला उपचारासाठी तातडीने जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून जेलरने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. महोबा जिल्हा कारागृहातील प्रभारी जेलरनं दिलेल्या माहितीनुसार किशोर बॅरकमध्ये बंद असलेल्या दोन कैद्यांमध्ये आयपीएल मॅच टीव्हीवर पाहण्यावरून मारामारी झाली. यामध्ये चोरीच्या आरोपाखाली जवळपास 1 वर्षांपासून जेलमध्ये बंद असलेल्या दीपक या कैद्याच्या डोळ्याला दुखापत झाली.

दीपकवर जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दुसरा आरोपी जयचंद पूर्णपणे सुरक्षित आहे.या जेलमध्ये कैद्यांच्या मनोरंजनासाठी टीव्ही लावण्यात आला आहे. आयपीएल मॅचच्या वेळी सर्व कैदी टीव्ही बघत होते. त्याचवेळी दीपक आणि जयचंदमध्ये भांडण सुरू झाले. या भांडणाचे रूपांतर थोड्याच वेळात मारामारीमध्ये झाले. या प्रकरणाची माहिती समजताच जेलर आणि अन्य सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी धाव घेत हे भांडण सोडवले. जयचंदनं केलेल्या मारहाणीत दीपकच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. दीपकवर सध्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची तब्येत स्थिर आहे. येत्या काळात या प्रकारचा कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याचे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. (Tufan Radha in jail after IPL match; One prisoner broke the other’s eye and ..)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: