नोकरीचा आमिष दाखवून अडकवले सेक्स रॅकेटमध्ये अन्..

पोलिसांनी संजय प्रसाद महतो, केदार मंडल आणि त्याच्या अन्य एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपी मागील बऱ्याच दिवसांपासून पुणे-मुंबई महामार्गावरील ब्रम्हा लॉजवर सेक्स रॅकेट चालवत होते. परराज्यातील तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सामाजिक सुरक्षा विभागाला पुण्याच्या आंबेगाव परिसरातील ब्रम्हा पॅलेस लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सेक्स रॅकेटबाबत पाठपुरावा केला. खात्री पटल्यानंतर पोलीस पथकाकडून ब्रम्हा पॅलेस लॉजवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. यावेळी पोलिसांनी दोन दलालांना अटक केली असून दोन तरुणींची सुटका केली आहे.
आरोपी विपुल बेलदरे आणि विक्रम शोनार दोघं उत्तर प्रदेशातील 20 आणि 21 वर्षीय तरुणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होते. आरोपींनी पीडित तरुणींना नोकरीच्या आमिषाने पुण्यात आणलं होतं. संबंधित तरुणींना हिंजवडी येथील हॉटेल कम्फर्ट इन मध्ये ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच वेश्याव्यवसायात अडकलेल्या दोन्ही तरुणींची सुटका केली आहे.