पंजाबनंतर राजस्थानमध्ये फेरबदल?  राहुल गांधी-सचिन पायलट यांच्यात बैठक 

0 206

नवी दिल्ली –  मागच्या काही महिन्यापासून काँग्रेस (Congress) पक्षाची सत्ता असणाऱ्या पंजाब (Punjab) आणि राजस्थान(Rajasthan) मध्ये पक्षांतर्गत संघर्ष सुरु आहे. काँग्रेस हायकमांड (Congress High Command)ने पंजाबमध्ये तोडगा काढत  काँग्रेसने राज्यात नव्या चेहऱ्यांना संधी दिली. चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर हायकमांडने आता काँग्रेससाठी दुसरा महत्वाचा राज्य असलेला राजस्थानमध्ये लक्ष घातला आहे. काँग्रेस खासदार  राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यात दि. १७ सप्टेंबर रोजी मॅरेथॉन बैठका घेतल्या. या भेटीत दोन्ही नेत्यांनी राजस्थानमधील परिस्थिती तसेच २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या ध्येयांवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग (Sachin Pilot) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या एक दिवस आधी ही बैठक झाली. राहुल गांधी आणि सचिन पायलट यांच्यात या वर्षीची ही पहिलीच बैठक होती. पायलट जुलै २०२० पर्यंत राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्यानंतर ही दोन्ही पदे त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा, राहुल गांधी आणि सचिन पायलट यांच्या भेटीदरम्यान राजस्थानमध्ये पक्षाच्या पुनर्रचनेवर गंभीरपणे चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.

“त्या” घटनेमध्ये बनावट तृतीयपंथी, केसमधून तृतीयपंथीय शब्द वगळावा – काजल गुरु

Related Posts
1 of 1,640

राजस्थानचे प्रभारी काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी राजस्थानला अनेक भेटी दिल्या आहेत आणि सर्व आमदारांची मते घेतली आहेत. मंत्रिमंडळात फेरबदल आणि काही निष्ठावान आमदारांचा समावेश, राज्यातील विविध मंडळे आणि महामंडळांमध्ये राजकीय नेमणुका करण्याची मागणी पायलट यांनी हायकमांडसमोर वारंवार मांडली होती. पण माकन यांनी अनेक भेटी देऊनही फेरबदल झाले नाहीत.  पायलट यांना पुन्हा आश्वासन देण्यात आले आहे की लवकरच फेरबदल होतील. पंजाबमधील निर्णयानंतर राजस्थानमधील काँग्रेस नेत्यांना केंद्रीय नेतृत्वाकडून निर्णायक हस्तक्षेपाची अपेक्षा आहे.

हे पण पहा –राष्ट्रवादी पुन्हा… नामदेव राऊतांचा भाजपला रामराम…

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: