लग्नाचा आमिष दाखवून पाच महिने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुलगी प्रेग्नंट होताच..

आरोपी युवकाने काही महिन्यांपूर्वी गावातीलच एका अल्पवयीन बालिकेशी प्रेमसंबंध निर्माण केले. तिला लग्नाचे आमिष दाखवत पाच महिन्यांपासून तो नियमित अत्याचार करत असल्याचा आरोप आहे. त्यानंतर अल्पवयीन बालिकेला गर्भधारणा (pregnant ) झाली. त्यामुळे पीडित बालिकेने आरोपीला लग्नासाठी गळ घातली मात्र त्याने लग्न करण्यास नकार दिला.
बालिकेने या घटनेची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. अल्पवयीन बालिका गर्भवती झाल्याचे माहित होताच कुटुंबियांनी बालिकेसह लाखांदूर पोलिसात धाव घेत आरोपी युवकाविरोधात तक्रार दाखल केली. मात्र त्याने लग्न करण्यास नकार दिला. या तक्रारीवरुन लाखांदूर पोलिसांनी आरोपी युवकाविरोधात अत्याचार आणि पॉस्कोसह अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. आरोपी युवकास अटक करण्यात आली आहे.पुढील तपास लाखांदुर पोलिस करत आहेत. (Torture of a five-month-old girl by showing her the lure of marriage; As soon as the girl becomes pregnant ..)