Toll Plaza to be closed: Government of India to take big decision; Information given by Nitin GadkariToll Plaza to be closed: Government of India to take big decision; Information given by Nitin Gadkari
मुंबई –  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठी घोषणा करत सरकार लवकरच GPS आधारित टोल ट्रॅकिंग सिस्टम आणणार आहे. त्यानंतर जनतेला टोल प्लाझावर थांबण्याची गरज भासणार नाही. GPS इमेजिंगद्वारे टोलची रक्कम वसूल केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. गडकरी आज संसदेत बोलत असताना ही माहिती दिली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं, की आगामी काळात सर्व टोल प्लाझा हटवले जातील. म्हणजेच रस्त्यावर आता कोणतीही टोल लेन नसेल. टोल वसूल करण्यासाठी GPS आधारित ट्रॅकिंग सिस्टम तयार केली जात आहे. ज्यात तुम्ही टोल प्लाझा पार केल्यानंतर तुमच्या बँक खात्यातून टोलची रक्कम कापली जाईल. यासाठी सरकार लवकरच एक धोरण आणणार आहे.

नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांच्या सुविधेसाठी टोल लेन रद्द केली जाईल. त्याऐवजी नॅशनल हायवेवर दर 60 किमीच्या अंतरावर एक टोल प्लाझा असेल. तसंच मध्येच असलेले सर्व टोल पुढील तीन महिन्यात हटवले जातील. टोल प्लाझा हटवले गेल्याने प्रवाशांना कुठेही टोल भरण्यासाठी थांबावं लागणार नाही. तसंच लोकांचा वेळही वाचण्यास मदत होईल. GPS Toll Collection पद्धतीत चालकाच्या बँक खात्यातून थेट पैसे कट केले जातील. या टोल कलेक्शनच्या पद्धतीने भविष्यात नागरिकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने जितक्या रोडचा वापर करण्यात आला, तेवढाच टोल द्यावा लागेल.

 GPS बेस्ड टोल सिस्टम लागू झाल्यास हे जीपीएस, वाहन ट्रॅकिंग डिव्हाईस किंवा ट्रान्सपोंडरसह फिट करावं लागेल. जीपीएस इमेजिंगच्या मदतीने तुमच्या प्रवासाच्या आधारे तुमचा टोल आकारला जाईल. त्याशिवाय GPS टोल कलेक्शन करण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंगचा उपयोग केल्यास, तुमच्या प्रवासाचे सर्व डिटेल्स ट्रॅक केले जाऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *