टोकियो ऑलम्पिक २०२० – भारतीय हॉकी संघाचा “शानदार” विजय

0 36
नवी दिल्ली –  टोकियो ऑलम्पिक २०२० (Tokyo Olympics 2020)  मध्ये भारतीय हॉकी संघाला ऑस्ट्रेलिया हॉकी (Australia Hockey) संघाकडून १-७ अश्या फरकाने  पराभवाला सामोरे जावं लागेल होते. मात्र आता भारतीय संघाने स्पेन (Spain) चा ३-० ने पराभव करत टोकियो ऑलम्पिक २०२० मध्ये आपला पहिला विजय प्राप्त केला आहे.

दिलासादायक – राज्यात करोनाबाधित रुग्णांची घट , आज इतक्या रुग्णांची नोंद

Related Posts
1 of 48
या सामन्यात भारतीय संघाकडून सिमरनजीत सिंह आणि रुपिंदर पाल सिंहने गोल केले आहे. १४ व्या मिनिटाला सिमरनजीतने पहिला गोल करत भारताचं खातं उघडलं.भारताला पेनल्टी कॉर्नरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. रुपिंदर यावेळी मिळालेल्या संधीचा फायदा घेत दुसरा गोल केला आणि २-० ने आघाडी घेतली. २४ व्या मिनिटाला पीआर श्रीजेशला मैदानात बोलण्यात आलं होतं. हाफ टाइम होईपर्यंत भारत २-० ने आघाडीवर होता. स्पेनेकडून वारंवार आक्रमक खेळी करत सामन्या पुनरागम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण भारतीय खेळाडूंनी संयमी खेळी करत स्पेनला रोखलं आणि पहिल्या विजयाची नोंद केली.

दोघा भावांवर जीवघेणा हल्ला, हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: