तोफखाना पोलिसांनी दोन मोबाईल तीस हजार किमतीचे मोबाईल मुळ मालकांच्या केले स्वाधीन

अहमदनगर – तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये हद्दीमध्ये डॉ. तुषार नरोडे यांचा मोबाईल हरवलेला होता तो मोबाईल गौरव शांताराम राऊत यांना सापडला असता त्यांनी प्रामाणिक पणे तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्याकडे स्वाधीन केला .
दुसऱ्या घटनेमध्ये आज दिनांक 29 मार्च 2022 डोंगरगण येथील आदिनाथ पाटील मते हे डोंगरगण येथून अहमदनगरकडे येत असताना त्यांच्या खिशातून मोबाईल पडला होता. सदरील मोबाईल सुनिल एकनाथ कसबे राहणार कसबे वस्ती तपोवन रोड अहमदनगर यांना सापडला असता त्यांनी सदर मोबाईल तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांच्याकडे तोफखाना पोलीस स्टेशन इथे येऊन दिला.
तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी व पोलीस उपनिरीक्षक समाधान साळुंके, पोलीस नाईक शैलेश गोमसाळे, पोलीस कॉन्स्टेबल सतीश त्रिभुवन यांनी वरील दोन्ही मोबाईल तीस हजार किमतीचे मोबाईल ताब्यामध्ये घेऊन सदरील मोबाईल मूळ मालकाशी संपर्क करून करून मालक डॉ.तुषार नरोडे व आदिनाथ पाटील मते यांचे मोबाईल त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरील चांगल्या कार्यामुळे पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीमती ज्योती गडकरी मॅडम यांनी एकनाथ कसबे व गौरव शांताराम राऊत यांच्या प्रामाणिकपणाचे अभिनंदन केले.