आज पेट्रोल 34 पैसे तर डिझेलच्या दरात इतकी वाढ,जाणून घ्या नवीन दर

0 253
pati at Newaskar petrol pump in Ahmednagar; Viral on social media

नवी मुंबई –  इन सणासुदीच्या काळात सामान्य जनतेच्या खिशाला दररोज वाद वाढत असलेल्या पेट्रोल (Petrol) – डिझेल (Diesel) दरामुळे मोठी कात्री बसत आहे. सरकारकडून या दरात कमी करण्यात यावी अशी मागणी जनतेमधून होत असली तरी परत एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. (Today petrol is 34 paise while diesel price is so high, find out the new rates)

देशातील बहुत शहरात आता पेट्रोल 110 पर्यंत पोहोचला असून डिझेल 100 च्या घरात आहे. यातच आज परत एकदा पेट्रोल 34 आणि डिझेलच्या प्रतिलीटर किमतींत 37 पैशांची वाढ झाली आहे. आज जाहीर केलेल्या किमतींनुसार मुंबई शहरात पेट्रोलचा प्रतिलीटर दर 110.75 रुपये आणि एका लीटर डिझेलसाठी 101.40 रुपये खर्च करावे लागत आहेत.

दुसरीकडे पॉवर पेट्रोलची प्रतिलीटर किमती 114.69 रुपये इतकी पोहोचली आहे. दुसरीकडे राजधानी दिल्ली शहरात पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 104.78 आणि 93.54 रुपयांवर पोहोचला आहे.

दरम्यान, या महिन्यात इंधनांचे दर सातत्याने वाढताना दिसत आहे. कारण याच महिन्याच्या केवळ सुरुवातीच्या दहा दिवसात पेट्रोलच्या दरांमध्ये 2.80 रुपयांची आणि डिझेलच्या किंमतीत एकूण 3.30 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

भाजपला हे लक्षात आल्यानेच …… ,  शरद पवार यांचा भाजपावर गंभीर आरोप

Related Posts
1 of 2,139

जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल – डिझेलचे दर

तुम्ही SMS’च्या मदतीने रोज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तपासू शकता.  इंडियन ऑइलच्या संकेतस्थळानुसार RSP सोबत तुमच्या शहराचा CODE नंबर टाइप करून 9224992249 या क्रमांकावर तुम्हाला SMS पाठवावा लागणार आहे.

BPCL ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि HPCL ग्राहक HPPrice असं टाईप करून 9222201122 या क्रमांकावर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाणून घेऊ शकतात. (Today petrol is 34 paise while diesel price is so high, find out the new rates)

हे पण पहा –  जमीर इनामदार यांचे हृदय विकराच्या झटक्याने निधन | देशसेवेत कार्यरत असताना निधन

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: