यशस्वी राजकारणी व बॉडी बिल्डर होण्यासाठी एक एक पायरी पार करावी लागते – वर्ल्ड बॉडी बिल्डर संग्राम चौगुले

0 7

जामखेड –  शरीर निरोगी व फिट राहण्यासाठी व्यायाामाची आवश्यकता आहे शरीर फिट असेल तर आपण आजारी पडू शकत नाही. नाव कमावण्यासााठी स्पर्धा असतात एकदा नाव कमाावले की आपण दुस-या ठिकाणी जाणे गरजेचे आहे व दुसऱ्याला संधी देण्याची गरज आहे तसेच राजकारणात आहे.

राजकारणात यशस्वी होण्यासाठी जसे सरपंच, नगरसेवक, आमदार खासदार व नंतर मंत्री असे होता येते त्याचप्रमाणे बॉडी बिल्डर मध्ये असेच आहे यातील एक एक स्टेप पार करून शरीर व नाव कमावता येते असे प्रतिपादन वर्ल्ड बॉडी बिल्डर संग्राम चौगुले यांनी केले.
येथील सेंट्रल पार्कमध्ये जिमच्या उद्घाटनाकरीता आ. रोहीत पवार व वर्ल्ड बॉडी बिल्डर संग्राम चौगुले आले होते त्यावेळी अयोजीत कार्यक्रमात संग्राम चौगुले बोलत होते. यावेळी बोलताना चौगुले म्हणाले मी कोल्हापूरचा आहे पैलवानमध्ये नाव कमवायचे होते पण जिमचा लळा लागला व बॉडी बिल्डर झालो सलग तीन वर्षे जागतीक पातळीवर प्रथम आलो. मी मागील २० वर्षांपूर्वी स्पर्धा केल्या आहेत जगात नाव झाले आहे त्यामुळे इतरांना संधी मिळावी म्हणून बाहेर पडलो आहे. बॉडी बिल्डर बरोबर शिक्षण पण महत्वाचे आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण…

यावेळी बोलताना आ. रोहीत पवार म्हणाले, राजकारणात नाव कमावण्यासाठी राजकीय वजन वाढवावे लागते ही संधी मला कर्जत जामखेड मतदारसंघाने आशिर्वाद देऊन दिली आहे. तर बॉडी बिल्डर क्षेत्रात वजन कमी करण्यासाठी व शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिम महत्त्वाची आहे. कोल्हापूरच्या संग्राम चौगुले यांनी जगात आपल्या देशाचे, राज्याचे व कोल्हापूरचे नाव केले आहे. आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या शिकल्या पाहिजे. मित्रपरिवार मोठा असेल तर त्याचा फायदा व नुकसान आहे. व्यवसाय करताना उधारीची वही भरत असेल तर काऊंटरपण भरले पाहिजे. सर्वसामान्य लोकांना जिम जॉईन करता येईल त्याप्रमाणे दर करावे त्यासाठी तुम्ही काही मदत करा व आम्ही करू शहरासाठी तालुका क्रिडांगणात कुस्ती, बॅडमिंटन कोर्ट, वॉकींग ट्रॅक, जिमचे साहित्य आदी सुखसोयी होण्यासाठी चार कोटी रुपये मंजूर करून आणले आहे. अद्यावत असे क्रिडांगण होणार आहे. संग्रामजी तुम्ही आता जे जामखेड पाहता ते तुम्ही तीन वर्षांनी या एखाद्या उदघाटनला तुम्हाला बोलावले त्यावेळी असलेले जामखेड पहा सर्व चेहरामोहरा बदलून टाकणार आहे असे आ. रोहीत पवार म्हणाले.

Related Posts
1 of 1,290

डॉक्टर कॉलोनीत चोरट्यांनी घरफोडून लंपास केले २ लाख ८५ हजार 

यावेळी युवानेते जयदत्त धस, प्रा. मधुकर राळेभात, डॉ. भगवान मुरूमकर, अजय काशीद यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष राजेंद्र कोठारी, विश्वनाथ राऊत, शिवाजी डोंगरे, मंगेश आजबे, ऊमर कुरेशी, सलीम बागवान, बिभीषण धनवडे, वराट दाजी, आप्पासाहेब कार्ले, झुबेर शेख, मनोज भंडारी, समीर पठाण आदी उपस्थित होते.

नियमांचे पालन न केल्यास लॉकडाउन – जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: