वर्गणीतून ग्रामस्थांनी वस्ती शाळा केली डिजिटल

प्रतिनिधी DNA मराठी टीम
श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव केंद्रातील टाकळी कडे गावातील वाळुंज वस्ती शाळेवर भव्य टॅब व डिजिटल स्कूल चा उदघाटन सोहळा आज पार पडला. श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव केंद्रातील टाकळीकडे येथील वाळुंज वस्ती शाळेवर भव्य टॅब व डिजिटल स्कूलचा (school digital) उदघाटन समारंभ संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा चेरमन बाबासाहेब इथापे हे होते त्यावेळी सुरवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर बोलताना मुख्याध्यापक ठाणगे सर म्हणाले की जिल्हा परिषद च्या अनेक शाळा डिजिटल झाल्या असून आपलीही शाळा डिजिटल करण्याचा प्रस्ताव मांडला त्यावर सर्व पालकांनी मोठ्या प्रमाणात वर्गणी करून जिल्ह्यातील सर्वात कमी पट असताना 85 हजार रुपये वर्गणी करून शाळा डिजिटल करण्यात आली आहे त्यातील एक टॅब डॉ सुभाष देशमुख यांनी शाळेला भेट दिला आहे तसेच वर्गणीची माध्यमातून शाळेला दोन टॅब तसेच एक स्मार्ट एल सी डी घेऊन शाळा डिजिटल करण्यात आली आहे .
तसेच शाळेचा संपूर्ण परिसर वाई- फाय करण्यात आला असून त्यातून विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल अशी आश्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे तसेच इयत्ता 1 ली मध्ये नवीन प्रवेश होणाऱ्या विद्यार्थी यांचे स्वागत करण्यात आले त्यावेळी सर्वाच्या तोडून मुख्याध्यापक ठाणगे सर व शीतल पाणमंद यांच्या माध्यमातून गुणवत्ता दर्जा सुधारला आहे त्यामुळे तोंडून शिक्षक व विद्यार्थी यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत होते या कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी एसएम ढवळे,आढळगाव केंद्र प्रमुख अनिलभदागरे तंटामुक्ती अध्यक्ष सुदाम नवले, उपसरपंच डॉ सुभाष देशमुख,सोसायटी चेरमन महेंद्र वाळुंज,व्हा चेरमन अशोक वाळुंज,संचालक सुभाष वाळुंज,पोलीस पाटील महेश वाळुंज,जालिंदर वाळुंज,दिलीप वाळुंज,नितीन वाळुंज,सरपंच पती प्रफुल्ल इथापे,अशोक नवले ,फक्कड वाळुंज,पत्रकार दादा सोनवणे अंगवाडी सेविका जगताप मॅडम आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.