
संगमनेर ः दुधाचा टँकर व दोन दुचाकीच्या विचित्र अपघातामध्ये तीन तरुण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगमनेर -अकोले रस्त्यावरील मंगळापूर शिवारात ही घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला.
Rohit Pawar : बारामती येथील ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल आमदार रोहित पवार अडचणीत
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर – अकोले रस्त्यावरील मंगळापूर शिवारात दुधाचा टँकर आणि दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. Three friends died in an accident तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी टँकर जप्त केला असून, चालकाला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे