आर्म अँक्ट व दरोड्याच्या गुन्ह्यातील चार वर्षांपासून फरार असलेले तीन आरोपी अटक

0 7

जामखेड –  मागील चार वर्षापासून दरोडा, आर्म अॅक्ट सह विविध गुन्ह्यांमध्ये फरारी असणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे. फरार आरोपी पकडण्याचा सिलसिला पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सातत्याने चालू ठेवली यामुळे तालुक्यातील इतर गुन्हेगारांमध्येही खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की,  चार वर्षांपासून फरार असलेले प्रदीप राजू कांबळे, बाळू सिताराम मिसाळ व विशाल जगन्नाथ जाधव हे सोनेगाव ता. जामखेड हे सोनेगाव या त्यांच्या गावी आले असल्याची खबर गुप्त बातमीदार मार्फत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात, पोलीस काॅन्स्टेबल संग्राम जाधव, आबासाहेब आवारे, अरूण पवार, विजय कोळी, संदीप राऊत, अविनाश ढेरे, गणेश गाडे या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले एक पथक तयार करून  आरोपी पकडण्यासाठी रवाना केले.

रेखा जरे हत्या प्रकरण –   पत्रकार बाळ बोठे याची अटकेची चर्चा ?

Related Posts
1 of 1,290

या पथकाने सापळा रचत दि. ९ मार्च रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास तीनही अरोपींना अटक करून पोलीस स्टेशन जामखेड येथे हजर केले.पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई राजेंद्र थोरात व पोलीस काॅन्स्टेबल सचिन देवढे हे करत आहेत.फरार गुन्ह्यातील आरोपी पकडण्याची कारवाई यापुढे सुरूच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या या मंत्र्याचे नाव चर्चेत मात्र … 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: