जनावर चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपीस अटक, मुद्देमाल जप्त

0 324
श्रीगोंदा –   श्रीगोंदा तालुक्यातील रुईखेल येथील फिर्यादी  तानाजी गुलाबगिरी गोसावी रा.रुईखेल ता.श्रीगोंदा यांनी फिर्याद दिली की , दि .23 आगस्ट रोजी रात्री फिर्यादीचे शेत गट नं .327 मधील शेतातील गोठ्यातुन 20 हजार रुपये किंमतीची 4 ते 5 वर्षे वयाची जर्सी गाय काळ्या तांबड्या रंगाची कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे . वैगेरे मजकुर चे फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 577/2021 भा.द.वि 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता .

दि .25 आगस्ट रोजी सपोनि दिलीप तेजनकर सो यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हा हा आरोपी शायबाज अन्सार शेख रा.चिंचोली रमजान ता.कर्जत याने त्याचे साथीदारासह केला आहे . बातमी मिळालेवरुन गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपी नामे शायबाज अन्सार शेख रा.चिंचोली रमजान ता.कर्जत यांस ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारा सोबत केला असल्याचे कबुल केले असुन रियाज हमीद शेख रा.रमजान चिंचोली ता.कर्जत याचा गुन्ह्यात वापरलेला एक छोटा हत्ती मालवाहु गाडी नं.एम.एच .14 सी.पी .8522 ही जप्त केली आहे.सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली गाय ही शोयब सलीम कुरेशी रा.सिध्दार्थनगर ता.कर्जत यास विकली असुन ती पुढे त्याने आळेफाटा येथिल बाजारात 10 हजार रुपये किमतीला विकल्याची सांगत आहे.
सदर आरोपींकडून 10 हजार रुपये हस्तगत केले आहे.सदर गुन्ह्यातील ईतर फरार आरोपी अटक झाल्यानंतर आरोपीकडुन आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे . सदर गुन्ह्याचा तपास सफौ भानुदास नवले हे करीत आहेत . सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील साहेब ,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव साहेब , पोलीस निरीक्षक रामराव ढिकले , यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे सपोनि दिलीप तेजनकर , सफौ.अंकुश ढवळे , पोना गोकुळ इंगवले , पोकॉ प्रकाश मांडगे , पोकॉ किरण बोराडे , पोकॉ दादासाहेब टाके , पोकॉ अमोल कोतकर , पोकॉ प्रकाश दंदाडे यांनी केली आहे .
Related Posts
1 of 1,463
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: