DNA मराठी

Ahmednagr news: शेतकऱ्यांचे बिल मागितल्याने कारखान्याकडून धमक्या.. पोलिस संरक्षणाची मागणी..!

४ एप्रिल पर्यंत नियमानुसार सर्व शेकऱ्यांना ऊसाचे बिल मिळाले नाही तर प्रहार चे तीव्र आंदोलन होणार...!

0 102

अहमदनगर :-  जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे संगमनेर (Sangamner) तालुक्यातील यू टेक शुगरने उसाचे पंधरवडा पेमेंट थकविल्याने शेतकरी (farmer) तसेच सहकारी सोसायट्या आणि पतसंस्था (Credit institution) अडचणीत आल्या आहेत. शेतकऱ्यांवरती उपासमारीची आणि पैसे मिळण्यासाठी दारोदार भटकण्याची वेळ आली असल्याने शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल तात्काळ अदा करावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने समाज माध्यमाद्वारे पैसे मागितल्याचा राग आल्याने संगमनेर (Sangamner) येथील यु टेक साखर कारखान्याचे मालक रवींद्र बिरोले यांनी दूरध्वनी द्वारे ‘तुम्हाला सोडणार नाही’ अशी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांना धमकी दिली आहे. तसेच यापूर्वीही त्यांनी प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन केले म्हणून धमकावले असल्याने दोघांनाही या साखर कारखान्याच्या मालकापासून जीवितास धोका असल्याने पोलीस संरक्षण मिळणे बाबत आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल तात्काळ अदा करावे अन्यथा आंदोलन करणार असल्याचे निवेदन मा. मुख्यमंत्री, मा. सहकार मंत्री, मा. पालकमंत्री, आ. बच्चुभाऊ कडू, साखर आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सहा. साखर आयुक्त यांना प्रहार चे वतीने निवेदन दिले आहे.

Adani Group: गौतम अदानी यांना 31,000 कोटींचा धक्का, पुन्हा शेअर्समध्ये प्रचंड घसरण

निवेदनात म्हटले आहे की, सामाजिक हिताच्या दृष्टीने ज्या उस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याने गाळप केलेल्या उसाचे नियमानुसार अद्याप पावेतो पेमेंट मिळाले नाही अशा शेतकरी बांधवांना आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करण्याचे जाहीर आवाहन केले होते. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांचे पेमेंट मिळाले नसलेबाबत आमच्याकडे रितसर निवेदन दिले या निवेदनामध्येच येवले आखाडा तालुका राहुरी येथील वयोवृद्ध शेतकरी (farmer) पंढरीनाथ माधव जाधव यांनी दिनांक 25 मार्च रोजी लेखी निवेदनाद्वारे पेमेंट मिळाले नसले बाबत तक्रार दिली. त्यानुसार आम्ही त्यांची कैफियत चित्रित करून सोशल मीडियावर जनहितार्थ प्रसारित केली. त्यामध्ये कोणत्याही साखर कारखानदाराला हेतूपुरस्सर दुखावण्याचा किंवा कोणताही वेगळा आरोप करण्याचा आमचा उद्देश नव्हता व नाही. फक्त शेतकऱ्यांना त्यांच्या गाळप झालेल्या उसाचे शुगर कंट्रोल ऍक्ट नुसार हक्काचे ऊस पेमेंट गाळप दिनांक पासून पंधरा दिवसात मिळावे ही बाब कारखानदार व साखर आयुक्त तसेच तमाम ऊस उत्पादक शेतकरी (farmer) यांच्या निदर्शनास प्रकर्षाने आणून देण्याचा आमचा हेतू आहे. गेल्या वर्षभरापासून अतिवृष्टीमुळे शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. त्यातच मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवट आहे. विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पतपेढ्या बँका यांच्याकडून घेतलेले पीक कर्ज भरणा करणे शेतकऱ्यांना गरजेचे असल्याने शेतकऱ्यांना कारखानदार उसाचे पेमेंट का देत नाही हे विचारण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही…Eknath Shinde
मात्र गजानन शुगर कवठे मलकापूर ता. संगमनेर (Sangamner)  यांनी वरील शेतकरी (farmer)  श्री पंढरीनाथ माधव जाधव यांची अशीच अडवणूक केल्याचे त्यांच्या निवेदनातून समजले. म्हणून प्रस्तुत ध्वनीचित्रफितीतून आम्ही समाज माध्यमातून प्रसारित केली म्हणुन गजानन शुगरचे चेअरमन रवींद्र बिरोले यांनी दिनांक 27 मार्च रोजी सकाळी अकरा वाजेच्या जवळपास गजानन शुगर च्या पुणे येथील कार्यालयातून दूरध्वनी करून प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अप्पासाहेब ढूस यांच्या मोबाईलवर शेतकरी जाधव यांच्या पेमेंट बाबत चर्चा करून तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दहा कोटीचा दावा तर करणारच परंतु तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली असल्याने त्यांच्या जीवितस धोका निर्माण झाला आहे. तरी पोलीस प्रशासनाने त्यांना पोलीस बंदोबस्त देऊन संबंधित कारखानदारावर योग्य ती समज देऊन कारवाई करावी ही विनंती.

तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांचेवर अहमदनगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे व ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांचे थकीत पेमेंट मिळण्यासाठी यू टेक उर्फ गजानन शुगरचे चेअरमन रवींद्र बिरोले यांनी अनेकदा फोनवर पोटे यांना कुटुंबीयांसमवेत बंदुकीतून गोळ्या घालून जिवे मारण्याची व शिवसेनेचे कार्यकर्ते हाताशी धरून वीस मिनिटात गायब करण्याची धमकी दिली होती आणि कोल्हापूरच्या पैलवाना पासून तर थेट पुण्याच्या काकडे पैलवानांकडून तुमचा बंदोबस्त करील अशी धमकी दिली असल्याचे पुणे पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना निवेदनाद्वारे वेळोवेळी कळविली असून अहमदनगर साखर सहा. आयुक्त यांच्या समक्ष झालेल्या सर्व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सहाय्यक आयुक्तांना पोलिसांमार्फत कारवाई करण्याचे उपस्थित सर्व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या ठराव द्वारे मागणीवरून आयुक्तांनी कारवाई करण्याचे जाहीर केले होते.

Related Posts
1 of 2,494

बिरोले यांचा खाजगी साखर कारखाना सुरू झाल्यापासून त्यांनी सलग दोन वर्षे पेक्षा जास्त काळ ऊस उत्पादकांचे पेमेंट थकविले असल्याने तत्कालीन साखर आयुक्त पुणे श्री सौरव राव यांनी सदर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्याचे अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांना आदेश दिले होते त्याचा सूड घेण्यासाठी सदर साखर कारखानदार हे प्रहारच्या पदाधिकाऱ्यांना अडकविण्याचा सदोदित सूडबुद्धीने प्रयत्न करीत असतात.

हिंदोनबर्गचा आणखी एक स्फोट, गौतम अदानी लक्ष्यावर नव्हे तर या व्यावसायिकांनी, कंपनीचे शेअर्स. 

संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथील युटेक उर्फ गजानन शुगर कारखान्याला शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिल संदर्भात अनेकदा मागणी केली असता हंगाम संपल्यानंतर कारखाना व तेथील कार्यालय बंद असल्याने पुणे येथे एस. पी. रोड वरील युटेक शुगर कार्यालयावर थकीत ऊस बिलाचे निवेदन देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे व प्रहारचे पदाधिकारी गेले असता रवींद्र बीरोले यांनी त्यांच्या कार्यालयात कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे खोटी छेडछाड केली असल्याची तक्रार दाखल केली होती. परंतु आमच्या सतर्क प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात प्रवेश करण्याअगोदर पासून तर थेट कार्यालयातून बाहेर येऊ पर्यंत व्हिडिओ चित्रीकरण सुरू ठेवले असल्याने महिला कर्मचाऱ्यांचा त्यात कुठलाही संदर्भ आला नसल्याचे स्पष्ट झाल्याने पुणे पोलीस आयुक्तांनी रविंद्र बिरोले यांना कडक शब्दात ठणकावले व संबंधित प्रहारचे आंदोलन होणार असून तुम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देण्याची तयारी ठेवा व पुन्हा असे खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्यावर कठोर कारवाई करण्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना पुणे शहर पोलीस आयुक्त यांनी आश्वस्त केले होते. असी परिस्थिती नेहमीच उद्भवत असल्याने अभिजित दादा पोटे व आप्पासाहेब ढूस यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याने त्यांना त्वरित पोलीस संरक्षण मिळावे असे निवेदनात म्हटले आहे..

तसेच हा कारखाना सुरू झाल्यापासून या कारखानदाराने आजतागायत म्हणजे 2023 चा चालू हंगामचे देखील शेकडो शेतकऱ्यांचे ऊस पेमेंट देण्यास टाळाटाळ करून सदर उस पेमेंटचा शुगर कंट्रोल कायद्याचा भंग करीत असून आजही शेकडो शेतकऱ्यांची ऊस पेमेंट थकीत असल्याने सदर थकीत पंधरवडा ऊस पेमेंटचे व्याज कायद्याप्रमाणे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे व आम्हाला शुगर कारखान्याची पेमेंट देय केलेल्या व थकीत असलेल्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची यादी मिळावी यासाठी आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी या कारखान्यावर सामाजिक दायित्व म्हणुन लवकरच युटेक उर्फ गजानन शुगर विरोधात अहमदनगर येथील सहाय्यक साखर आयुक्त यांच्या कार्यालयावर संविधानिक व कायदेशीर मार्गाने दिनांक चार एप्रिल पर्यंत या कारखान्याचे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व थकीत ऊस बिल अदा करावेत अन्यथा प्रशासनाला पूर्व सूचना देऊन आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची व आमच्या जीविताची सर्वस्वी जबाबदारी माननीय साखर आयुक्त पुणे व सहाय्यक साखर आयुक्त अहमदनगर यांची राहील अशी निवेदनाच्या शेवटी म्हटले आ

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: