
अहमदनगर – भैरवनाथ बेलवंडी सहकारी सोसायटी निवडणूक 2022 चा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून 11 जून रोजी मतदान होणार असून मतदानासाठी या संस्थेचे एकूण सभासद 3765 इतके आहेत.अजून 1 महिन्याचा कालावधी अजून बाकी आहे.परंतु आताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दि.5 रोजी सायंकाळी अण्णासाहेब शेलार यांनी सभासद शेतकऱ्यांसाठी बेलवंडी येथे शेतकरी मेळावा व स्नेहभोजन चा कार्यक्रम घेतला.या मेळाव्यास सुमारे 2500 ते 3000 शेतकऱ्यांनी हजेरी लावली.एवढया मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याने अण्णासाहेब शेलार यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ सोसायटी ची निवडणूक ही एकहाती होईल असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन जयसिंगराव लबडे यांनी केले.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लाढाणे सर होते यावेळी संदीप तरटे,सुनील ढवळे, सलीम शेख,युवराज शेलार, उत्तम डाके, अमोल काळाने, एकनाथ पवार, अश्रू डाके, ऋषिकेश शेलार, मुरलीधर ढवळे आदींनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास संबोधित करताना अण्णासाहेब शेलार म्हणाले की गावचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद च्या माध्यमातून अनेक कामे केली आहेत. सोसायटी ची नूतन इमारत देखील दिमाखात उभी केली आहे हे सर्व तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे.
बाहेरची लोक आमच्या गावात येऊन सांगतात की सोसायटी त्यांच्या ताब्यातून काढून घ्या लागेल ती मदत करायला मी तयार आहे.काही लोकांना दुसऱ्याच्या गावात जाऊन ढवळाढवळ करायची सवय लागली आहे. नावासाठी राजकारण करणाऱ्यांनी आमच्या गावात येऊन राजकारण शिकवण्याची गरज नाही. त्याचबरोबर गावाचे तुकडे करण्यासाठी आणि सोसायटीचा नाश करण्यासाठी बाहेरची अर्थिक शक्ती आपल्या गावात येऊ पाहत आहे या आर्थिक शक्तीला बाहेरच रोखण्याचे काम सभासद नक्कीच करतील असा टोला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी अप्रत्यक्ष रित्या राजेंद्र नागवडे यांना लगावला.
यावेळी सुभाष काळाने, दिलीप रासकर, बाळू वैद्य, शंकर लाढणे, सुनिल ढवळे, युवराज पवार, सोपान हिरवे, संभाजी इथापे, शरद इथापे, निवृत्ती शेलार, अजित भोसले, सुशील मुनोत, नारायण चोभे,नामदेव साळवे,यांच्यासह बेलवंडी ग्रामपंचायत चे सदस्य, सर्व पतसंस्था चे चेअरमन व्हा. चेअरमन, संचालक, भैरवनाथ सोसायटी चे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ,सभासद शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय डाके यांनी केले तर आभार व्हा. चेअरमन स्वप्नील घोडेकर यांनी मानले.