तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेला हा केविलवाणा प्रयोग – आ. निलेश लंके

0 705

 अहमदनगर –  पारनेर तहसीलदार ज्योती देवरे( Tehsildar Jyoti Deore) यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडिया (Social Media) वर व्हायरल झाल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिप मध्ये तहसीलदार ज्योती देवरे आत्महत्या करण्याचा इशारा देत आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये नाव न घेता पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले आहे.(This unfortunate experiment done by Tehsildar Jyoti Deore – MLA. Nilesh Lanke)

ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता पारनेरचे आमदार निलेश लंके(Nilesh Lanke)  यांनी DNA मराठीशी बोलताना या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेला हा  केविलवाणा प्रयोग आहे.  त्यांच्यावर मागच्या आठ दिवसांपूर्वी गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले असून असा अहवाल नाशिक विभाग आयुक्त गमे साहेब यांनी मुंबईला देखील पाठवला आहे.

पारनेर तहसीलदारांच्या पाठीमागे मनसे खंबीरपणे उभे राहणार

Related Posts
1 of 1,512

या आधी सुद्धा तहसीलदार ज्योती देवरे यांनी असेच बरेच प्रयोग केले असल्याचा आरोप देखील आमदार निलेश लंके यांनी केला आहे. मला व्यक्तिगत स्वरुपात देखील रात्री-अपरात्री मेसेज करून आत्महत्या करण्याची धमकी त्यांनी दिली असल्याची प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी DNA मराठीशी बोलताना दिली आहे.(This unfortunate experiment done by Tehsildar Jyoti Deore – MLA. Nilesh Lanke)

हे पण पहा – नगर पोलिसांची राज्यात प्रथम ई-टपाल(E-TAPAL)कार्यप्रणाली सुरु

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: