श्रीगोंदयाच्या या सुपुत्राची औरंगाबाद येथे पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती

प्रतिनिधी DNA मराठी टीम
श्रीगोंदा :- सध्या मुंबई येथे गृह खात्यात पीएसआय (PSI) या पदावर कार्यरत असलेले काशिनाथ दगडू महांडुळे यांची नुकतीच औरंगाबाद (Aurangabad) येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक या महत्वाच्या पदावर पदोन्नती झाली आहे . त्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
काशिनाथ महांडुळे हे मुळ रूईखेल ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर येथील एका शेतकरी कुटुंबातील सदस्य आहेत. घरात पहिल्यापासून समाजकार्याचा, कष्टाचा, सुसंस्काराचे व धार्मिकतेचा वसा असल्या कारणाने त्यांच्यावर लहानपणापासूनच आजी आजोबा व आई वडीलांच्या माध्यमातून चांगल्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. यातूनच प्रेरणा घेऊन यापुर्वी त्यांनी गृह खात्यातील विविध पदावर आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले आहे.
नुकताच गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर त्यांच्या रूईखेल येथील राहत्या घरी त्यांचे आई (जनाबाई)व वडील (दगडू अण्णा) यांचे हस्ते त्यांना एपीआय पदाचा मानाचा स्टार लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्य तसेच सर्व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी त्यांचे वडील दगडू आण्णा महांडुळे यांनी वयाची ७१ वर्ष पुर्ण केल्याबद्दल अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना त्यांनी आजी, आजोबा, आई, वडील, चुलता, चुलती यांच्या संस्कारामुळे व सर्व कुटुंबीयांच्या प्रेरणेमुळेच मी ही यशाची उंची गाठू शकलो अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. सर्वांच्या सदिच्छांच्या बळावर यापेक्षाही वरिष्ठ पदाला निश्चित गवसणी घालून न्याय देन्याचा प्रामाणिक प्रयत्न करील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी महांडुळे परिवाराने गावाविषयी, नातेवाईका विषयी, मित्र परिवारा विषयी, संत महात्मे यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त केली. शेवटी डॉ.दत्तात्रय शिंदे (पुणे) यांनी आपल्या मधुर वाणीतून विश्वप्रार्थना करून कार्यक्रमाची गोड सांगता केली.