आज पासून देशभरात लागू होणार हे नियम

0 8

नवी दिल्ली – संपूर्ण देशभरात एक मार्चपासून म्हणजेच सोमवार पासून काही नियम लागू होत आहे.  यामध्ये काही नियम असे आहेत त्यांचा थेट परिणाम सामान्य नागरिकाच्या खिशावर होणार आहे.

हे नियम लागू होणार एक मार्चपासून –

सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेच्या कोणत्याही एटीएम मधून ग्राहकांना १ मार्च पासून दोन हजार रुपयांची नोट मिळणार नाही आहे.

मात्र बँकेच्या काउंटवरुन ग्रहाक २ हजारांची नोट घेऊ शकतात. इंडियन बँकेने या बद्दल म्हटले आहे की एटीएम मधून पैसे काढल्यानंतर ग्राहकांना २ हजार रुपयांचे सुट्टे मिळण्यासाठी बँकेत येतात. त्यामुळेच तत्काळ दोन हजार रुपयांचे नोटा एटीएम मधून दिल्या जाणार नाहीत.

एसबीआयच्या ग्राहकांसाठी KYC अनिवार्य

Related Posts
1 of 1,292

एक मार्च पासून स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयच्या युजर्सला केवायसी (KYC) करणे अनिवार्य असणार आहे. असे न केल्यास खातेधारकांचे अकाउंट बंद केले जाणार आहे. यासाठी एसबीआय ग्राहकांना आपले अकाउंट अॅक्टिव ठेवण्यासाठी केवायसी पूर्ण करावी.

टोल प्लाझावर मोफत मिळणार नाही FASTAG

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी असे म्हटले आहे की, एक मार्च पासून देशभरातील टोल प्लाझावर फास्टॅग खरेदी करण्यासाठी १०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहेत. याचा अर्थ असा की २८ फेब्रुवारीनंतर मोफत फास्टॅग खरेदी करण्याची सुविधा बंद होणार आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: