तिसऱ्या पतीपासून विभक्त होणार ‘ही’ चर्चित अभिनेत्री, जाणून घ्या कारण

0 498
 नवी मुंबई –  आपल्या देशातील अनेक सेलिब्रिटी (Celebrity) प्रसारमाध्यमांत किंवा सोशल मीडिया (Social media) वर आपल्या कामांबरोबरच आपल्या खासगी आयुष्या (Private life) मुळे देखील चर्चेत राहतात. समाजात केलेल्या कोणत्या चांगल्या कामामुळे किंवा आपल्या जोडीदारांसोबत असणाऱ्या काही वादामुळे अनेक सेलिब्रिटी चर्चचा विषय बनून राहतात. अशी एक अभिनेत्री (Actress) म्हणजे श्राबंती चॅटर्जी (Sarbanit  Chatterjee) होय. ही बंगाली अभिनेत्री (Bengali actress) सध्या आपल्या खाजगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी लवकरच तिच्या पतीपासून विभक्त होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या अगोदर श्राबंतीचे  दोन वेळा घटस्फोट (Divorce) झाला आहे .  त्यानंतर आता ती तिसरा पती रोशन सिंह (Roshan Singh) यांच्यापासूव विभक्त होणार आहे. यासाठी तिने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दिलाय. २००३ सालामध्ये श्राबंतीने फिल्म मेकर राजीव कुमार यांच्याशी पहिला विवाह केला होता. २०१६ मध्ये ती राजीव यांच्यापासून विभक्त झाली आणि तिने मॉडल कृष्ण व्रजशी लग्न केलं. मात्र हे लग्न फक्त एक वर्ष टिकलं. तर २०१९ सालामध्ये श्राबंतीने रोशल सिंह यांच्याशी विवाह केला होता. हे तिचं तिसरं लग्न होतं.

धक्कादायक ! पतीच्या निधनानंतर पत्नीची ही रेल्वेखाली आत्महत्या

Related Posts
1 of 81

एक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत श्राबंतीचे पती रोशन सिंग यांनी श्राबंती मित्रपरिवारात त्यांची बदनामी करत असल्याता दावा केलाय. रोशन खूप जाड असल्याचं ती इतर लोकांमध्ये सांगत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. रोशन सिंह जाड असल्याने तिच्यासोबत सेक्स करत नाहीत आणि म्हणून त्यांच्यापासून विभक्त व्हायचंय असं श्राबंती मित्रांना सांगून बदनामी करत असल्याचा खुलासा रोशन सिंह यांनी केलाय. याशिवाय श्राबंतीवर तिचे पती रोशन सिंह यांनी अनेक आरोप केले आहेत. एक्स गर्लफ्रेण्डला कॉल करून ती अनेक तक्रारी करत असल्याचं त्यांनी म्हंटलंय.

हे पण पहा  –उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांनी अडवला पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा ताफा | दादा मला पाच मिनिट वेळ द्या

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: