इंधन दरवाढीवरून भाजपाला या  खासदाराने दिला घरचा आहेर 

0 14
नवी दिल्ली –  देशात आलेल्या  कोरोना संकटादरम्यान झालेल्या इंधन दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांच्या खिश्याला कात्री बसत आहे.  त्यामुळे सर्वसामान्यांना काल दि १ फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात  पेट्रोल आणि डिझेल दरांसंदर्भात काही मोठ्या निर्णयाची अपेक्षा होती. मात्र,  सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षेवर  पाणी फेरले गेले आहे.
देशात विरोधी पक्ष सध्या याच मुद्यावर मोदी सरकारवर टीका करत आहे. याचदरम्यान भारतीय जनता पक्षाच्या नेते  सुब्रमण्यम स्वामी यांनी केद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधून केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे .
 भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी  यांनी ट्विट करून देशात वाढत असलेल्या  पेट्रोल आणि डिझेल यांच्या दररावरून टीका केली आहे.  त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि  रामाच्या भारतात पेट्रोलचा दर ९३ रुपये प्रति लिटर, सीतेच्या नेपाळमध्ये पेट्रोलचा दर ५३ रुपये प्रति लिटर, तर रावणाच्या लंकेत पेट्रोलचा दर ५१ रुपये प्रति लिटर, असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. त्यांनी यापूर्वीही पेट्रोल दर वाढीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
Related Posts
1 of 1,291

याप्रकरणावरून आधीच विरोधक मोदी सरकारवर टीकाकारत आहे आणि आता भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका केल्यानंतर आता भाजपा कडून काय उत्तर येतो हे पाहावे लागेल .

१५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाच महिन्यांपासून बलात्कार, लैंगिक अत्याचार करणाऱ्या आठ जणांना अटक  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: