मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दुसऱ्याकडे देण्याची ही वेळ – चंद्रकांत पाटील

0 88

कोल्हापूर – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सत्ताधारी शिवसेनावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी अन्य कुणाकडे सोपवण्याची ही वेळ आहे. (This is the time to hand over the responsibility of Chief Minister’s post to another – Chandrakant Patil)

चंद्रकांत पाटील म्हणाले कि भारतीय संस्कृतीमध्ये एकमेकांच्या तब्येतीवर टीका टिप्पणी करणं नाही, कारण तो विषय त्या माणसाच्या हातामध्ये नसतो. किंबहुना शत्रू जरी असेल, उद्धव ठाकरे तर आमचे मित्र आहेत. पण शत्रू जरी असला तरी त्याच्या तब्यतीबद्दल आपण त्याला शुभेच्छा देतो. त्यामुळे तो विषय नाही, विषय वारंवार असा चाललेला आहे की, जर अशी तब्यतीची स्थिती असेल तर त्यांनी कोणाला तरी चार्ज दिला पाहिजे. याच कारण खूप विषय महाराष्ट्रासारख्या १२ कोटी जनता असणाऱ्या राज्याचे असतात. कालची बैठक ही अत्यंत महत्वपूर्ण होती, तुम्ही टोपेंना पाठवलं, दिलीप वळसेंना पाठवलं. देशाच्या सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री असताना, आपल्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना बोलायला वाव मिळणार नाहीच. पण तेच जर तुम्ही असता तर तुम्ही केवळ मुख्यमंत्री नाहीत, तर तुमचे खूप जवळचे संबंध देखील आहेत.

दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत, पाट्या कशा बदलणार? – इम्तियाज जलील

Related Posts
1 of 1,635

त्यामुळे चारवेळा बैठकीत मोदी विचारत असतात, उद्धव ठाकरे तुमचं काय मत आहे. पण तुम्ही तब्येतीमुळे नाही जाऊ शकलात आणि तब्येतीची हेळसांड देखील करू नये. परंतु, राज्याच्या हितासाठी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत. पंतप्रधान मोदींचं देखील हेच म्हणणं आहे की पोटावर पाय आणून निर्बंध लादू नका. महत्वपूर्ण निर्णय करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष उपलब्ध नाहीत. घरी बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करतो वैगरे हे पुरत नाही. मग सगळ्या मुख्यमंत्र्यांनी तसच केलं असतं. मुख्यमंत्री म्हणजे उठणे, जाणे, भेटणे, चर्चा करणे, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे असं आहे. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी खरंच दुसऱ्याकडे देण्याची ही वेळ आहे.

तसेच, मी तुमच्या तब्यतीबाबत परमेश्वराकडे प्रार्थना करतो की लवकर हे बरे व्हावेत. परंतु तोपर्यंत कोणीतरी तुमच्यावतीने मुख्यमंत्री म्हणून… कारण मुख्यमंत्री या शब्दात अर्थ आहे. मुख्यमंत्री या शब्दात ताकद आहे, त्यामुळे तो लागेल आणि तो कोण असेल ते तुम्हीच ठरवायचं आहे. असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं.(This is the time to hand over the responsibility of Chief Minister’s post to another – Chandrakant Patil)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: