ड्रग्ज प्रकरणावर आर्यन खानने पहिल्यांदाच दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाला,माझी प्रतिष्ठा..

मुंबई – बॉलीवूड किंग (Bollywood King) अभिनेता शाहरुख खानचा (Shaharuk Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला एनसीबीने (NCB) ड्रग्ज प्रकरणात 2 ऑक्टोबर रोजी अटक केली होती. तत्कालीन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखडे यांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत आर्यन खानला अटक केली होती. या प्रकारात आर्यन खानला 28 दिवस तुरुंगात देखील राहावे लागले होते. मात्र आता या ड्रग्ज प्रकरणात कोणतेही ठोस पुरावे न मिळाल्याने आर्यनची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच एनसीबीच्या त्या कारवाईवर आणि तपासावर मोठा प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आलं होता.
या प्रकारात अदयाप शाहरुख खान किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही काही प्रतिक्रिया दिली नाही. पण आता एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांनी दिलेल्या मुलाखतीत आर्यन खानच्या वक्तव्यावर मोठा खुलासा केला आहे.
संजय सिंहच्या म्हणण्यानुसार, ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानशी बोलायला गेल्यावर स्टार किडने याबद्दल बोलण्यास संकोच केला आणि विचारलं की, तो त्याच लायकीचा आहे का? ड्रग्जच्या बाबतीत पहिल्यांदाच आर्यनने संजय सिंग यांना सांगितले होतं, ”सर, तुम्ही मला आंतरराष्ट्रीय ड्रग स्मगलर बनवलं आहे. मी ड्रग्जमध्ये पैसे गुंतवतो. हे आरोप बिनबुडाचे नाहीत का? त्यांना माझ्याजवळ कोणतेही ड्रग्ज सापडले नाही. असं असतानाही त्यांनी मला अटक केली.
साहेब, तुम्ही माझ्यावर खूप अन्याय केलात आणि माझी प्रतिष्ठा पणाला लावली. मला इतके आठवडे तुरुंगात का घालवावे लागले? मी खरच त्यास पात्र होतो का?” संजय सिंहने असंही सांगितलं की, रडत रडत शाहरुख खानने त्यांना सांगितलं की, लोकं त्याला ‘राक्षस’ म्हणून चित्रित करत आहेत, पण तो आणखी मजबूत होत आहे.