हा फार मोठं षडयंत्र , खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटील – हसन मुश्रीफ

0 601
नवी मुंबई – भारतीय जनता पक्षा (BJP)चे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी कराड येथे पत्रकार परिषद  घेऊन परत एखदा राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) सह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे. या आरोपांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर देत आपल्या तब्येतीची चौकशी केल्याबद्दल किरीट सोमय्या यांचे आभार मानले आहे. 
Related Posts
1 of 1,654

आपल्या पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ म्हणाले कि किरीट सोमय्या जे आरोप करत आहेत, त्यामागे भारतीय जनता पार्टीचं फार मोठं षडयंत्र आहे. आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे याचे खरे मास्टरमाईंड (Mastermind) आहेत. मी अनेक वेळा माध्यमांसमोर येऊन बोललो आहे, आवाज उठवला आहे आणि यामुळे भाजपाचे नेते मला कसं थांबवता येईल, दाबता येईल याचा प्रयत्न करत होते. किरीट सोमय्या यांचा वापर त्यांनी फक्त टूल म्हणून केलेला आहे. चंद्रकांत पाटलांना सातत्याने चिंता वाटते की आपण प्रदेशाध्यक्ष आहोत त्या जिल्ह्यामध्ये भाजपा भुईसपाट झालेला आहे. हा कोणी भुईसपाट केला? तर हसन मुश्रीफ याला कारणीभूत आहेत. म्हणून त्यांनी गेल्यावेळेला मला भारतीय जनता पार्टीत येण्याची सुद्धा विनंती केली होती. मात्र पवार एके पवार म्हणत मी ती विनंती मान्य केली नाही.

हे पण पहा –राष्ट्रवादी पुन्हा… नामदेव राऊतांचा भाजपला रामराम…

कायदा व सुव्यवस्थेच्या कारणासाठी कोल्हापूर दौरा रद्द केल्याने संतापलेल्या किरीट सोमय्या यांनी कराड इथं पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या पुढच्या कामाची दिशा सांगितली. यावेळी लवकरच मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा बाहेर काढणार तसंच याविरोधात ईडीकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, हसन मुश्रीफ यांचे जावई हे ब्रिक्स इंडिया लिमिटेड या कंपनीचे बेनामी मालक आहेत. ही कंपनी आणि सरसेनापती कारखान्यामध्ये ५० कोटीची आर्थिक उलाढाल झाली आहे. या कंपनीत आलेले पैसे अपारदर्शक पद्धतीने आले आहेत. या व्यवहाराबद्दल काहीही माहिती नाही. एकूण १०० कोटींचा हा घोटाळा आहे.अशी टीका त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केली आहे.

उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा मी चालू देणार नाही – किरीट सोमय्या

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: