कॉफी शॉपच्या नावाखाली चालू होता हा भयंकर प्रकार, पोलिसांनी धाड टाकली अन्…

0 621
नांदेड –   नांदेड (Nanded) शहराच्या अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे (Vijay Kabade) यांनी एक धक्कादायक प्रकरण समोर आणला आहे.  पोलिसांनी शहरात कॉफी शॉप (Coffee shop) च्या नावाखाली अश्लील चाळे करणाऱ्या कॉफी शॉपवर  धाड टाकून पाच तरुणांना आणि एक अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणात मिळालेली अधिक माहिती अशी कि  शहरात  मागच्या काही दिवसांपासून अंधाऱ्या कोठड्या करुन अल्पवयीन तरुणींसोबत अश्लील चाळे होत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांना मिळाली होती . कॉफी शॉपच्या मालकांकडून या तरुण- तरुणींकडून पैसे घेऊन त्यांना जागा उपलब्ध करुन दिली जात होती, अशी गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कॉफी शॉपवर धाड टाकली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Related Posts
1 of 1,608
विशेष म्हणजे, या कॉफी शॉपमध्ये कॉफी बनवण्याचे कोणतेही साहित्य नव्हते. तर, बरेचसे साहित्य वापरत नसल्याचे दिसून आले. याचसोबत काही आक्षेपार्ह वस्तूही तिथे आढळून आल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी शहरात अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करणारे निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केलं आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: