ब्रँडिंग व मिडिया प्लॅनिंग क्षेत्रात थिंक ब्रँडेड ग्राहकांच्या पसंतीस उतरेल- विख्यात निवेदिका यशा पाळणकर

0 10

श्रीगोंदा    नामांकित राजकीय व्यक्तिमत्व, कंपनी आणि विविध संस्थांच्या सेवेसाठी मार्केटींग क्षेत्रात उतरत असलेल्या थिंक ब्रँडेड प्रमोशन्सचे नुकतेच अनावरण करण्यात आले. यावेळी नगर जिल्ह्याचे सुपुत्र अवधुत राऊत आणि क्रिएशन ग्रुपच्या थिंक ब्रँडेड या ब्रँडचे राजकीय व सामाजिक व्यक्तिमत्त्व, कंपनी, विविध संस्था यांची ब्रँडिंग व मिडिया प्लॅनिंग ठरवण्यासाठी ही कंपनी काम करणार आहे. तसेच सेलिब्रिटी मॅनेजमेंट आणि कॉर्पोरेट इव्हेंट प्लॅनिंग क्षेत्रात देखील ही कंपनी कार्यरत राहील अशी माहिती थिंक ब्रँडेडचे अवधुत राऊत यांनी यावेळी दिली .

                               निलेश राणे यांना आपल्या स्टाईलने अजित पवार यांनी दिला हा भन्नाट उत्तर

यावेळी उदघाटन समयी बोलताना थिंक ब्रँडेडच्या ब्रँड अँबेसिडर विख्यात निवेदिका यशा पाळणकर म्हणाल्या की, अवधुत राऊत यांनी सुरू केलेला हा प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी आहे. येणाऱ्या काळात थिंक ब्रॅंडेड प्रमोशन्स आपल्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांच्या पसंतीस उतरेल. नगर आणि पुणे जिल्ह्याच्या बाबतीतच बोलायचं झालं तर ही फर्म आपल्या दृष्टीने भूषणावह आहे.

                                                          काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंची निवड

Related Posts
1 of 1,290

थिंक ब्रँडेड ही मनाचं मनाशी नातं जोडणारी, खांद्याला खांदा देणारी एक सहकारी युनिट आहे. या फर्मला आगामी काळात उच्च मानांकन लाभेल. यावेळी थिंक ब्रँडेडच्या माहीती पुस्तिकेचे अनावरण युवा उद्योजक समिर गायकवाड, देवल गायकवाड, तसेच प्राचार्य अमोल खेडकर व प्रा.सुजाता खेडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रभान ठुबे, संतोष ओहोळ, विशाल सकट, कुमार लोखंडे, शशिकांत पाचपुते, निसार शेख आदी उपस्थित होते .

                                  विधानसभा अध्यक्ष कोण होणार हे मुख्यमंत्री ठरवतील – उदय सामंत

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: