श्रीगोंदा तालुक्यात चोरट्यांनी दुकान फोडले: रोख रक्कम व दागिने लंपास; गुन्हा दाखल

प्रतिनिधी DNA मराठी टीम
श्रीगोंदा – मढेवडगाव ता. श्रीगोंदा (Shrigonda) येथे नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दुकान मालक शिवाजी कुरूमकर यांच्या प्रज्वल जनरल स्टोअर्स या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला व दुकानाच्या पाठीमागे असलेल्या घरात शिरून १५ हजाराची रोख रक्कम (Cash) व जवळपास चार तोळ्यांचे दागिने (jewelery) मिळून ६७ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
याबाबत शिवाजी संताजी कुरुमकर (वय वर्षे ५५) रा. मढेवडगाव यांनी फिर्याद दिली आहे. कुरूमकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की मी, पत्नी व मुलांच्याबरोबर जेवण करून झोपल्यावर रात्री १०: ३० ते ३:१५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश केला व गल्ल्याची उचकापचक करून रोख रक्कम १५ हजार रुपये घेतले व घरात प्रवेश करून कपाटातील मंगळसूत्र, कर्णफुले असे चार तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ६७ हजारांचा ऐवज चोरला आहे.
Related Posts
पहाटे हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांना कळविले. सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित माळी व पोलीस हवालदार रोहिदास झुंजार यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. पुढील तपास हवालदार रोहिदास झुंजार करत आहेत.