पोकलँडचा ब्रेकर चोरणारे चोरटे जेरबंद , दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीगोंदा :- श्रीगोंदा शिवारात शेततळ्याचे काम चालू असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने मच्छिंद्र दत्तात्रय शिंदे (वय 47 वर्षे रा . श्रीगोंदा लक्ष्मीनगर , ता.श्रीगोंदा) यांच्या मालकीचे पोकलॅण्डचे ब्रेकर जी.बी .9 एफ कंपनीचे चोरून नेले होते. त्यावरून मच्छिंद्र दत्तात्रय शिंदे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास चालु असताना 12 मे रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी सदर गुन्ह्याचे तपासाबाबत सुचना देऊन तांत्रिक तपासाचे आधारे व गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहीतीवरुन त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना सूचना दिले.
त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण पथकाने संशयित इसम नामे दत्तात्रय दशरथ म्हस्के (वय 31 वर्षे रा . नावळी ता . पुरंदर, अक्षय नानासो घाटे वय 32 वर्षे रा.घाटेवस्ती , कोळविहारे ता . पुरंदर) यांना ताब्यात घेतले व त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुशंगाने कसुन चौकशी केली असता त्यांनी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता गुन्हाची कबुली देवुन चोरी केलेला रु .6,00,000 ( सहा लाख रुपये ) किंमतीचा पोकलँण्ड मशिनचे ब्रेकर जी.बी .9 एफ कंपनीचे व 4,00,000 / – ( चार लाख रुपये ) किंमतीचे गुन्ह्यात वापरलेले महींद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम.एम .12 के.पी. 1696 हस्तगत करण्यात आले आहे . आरोपी पोलीस कस्टडी मध्ये असुन त्यांचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे . सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई समीर अभंग हे करीत आहेत .
Related Posts
सदरची कारवाई अहमदनगर पोलीस अधिक्षक मनोज पाटील , अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल ,उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले पोसई समीर अभंग , सफी अंकुश ढवळे , पोना गोकुळ इंगवले , पोकॉ प्रकाश मांडगे , पोकॉ किरण बोराडे , पोकॉ दादासाहेब टाके , पोकॉ अमोल कोतकर , पोकॉ प्रशांत राठोड यांनी केली आहे .