हे लोक फक्त ईडी, सीबीआयच्या नावाने धमक्या देतात – शिवसेना

0 377
नवी मुंबई –  भाजपा (BJP) नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूपाचे आरोप लावल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यासह भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर टीका करत आरोप लावले आहे. या आरोपांना उत्तर देत चंद्रकांत पाटील यांनी  कायद्याची लढाई कायद्यानं लढा, कायद्याची लढाई कोल्हापुरी चपलेनं लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणं सोप्पं आहे, पण ईडीला फेस करणं कठीण आहे. तोंडाला फेस येईल म्हणत हसन मुश्रीफ  यांच्यावर निशाणा साधला होता. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन आता शिवसेने (Shiv Sena) ने सामनाच्या संपादकीयच्या (Saamana editorial) माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे.
Related Posts
1 of 1,640

ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या खिशातच आहेत व त्यांच्या जोरावर आपण राजकीय विरोधकांना धमक्या देऊ शकतो, असे महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना वाटत आहे आणि तसे धमकी सत्र त्यांनी चालवले आहेच. काही झाले की, हे लोक फक्त ईडी (ED), सीबीआयच्या (CBI) नावाने धमक्या देतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरच्या हसन मुश्रीफ यांनाही धमकावले आहे की, ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल. पाटील यांना ईडीचा इतका अनुभव कधीपासून आला? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

हसन मुश्रीफ हे मंत्री आहेत आणि कोल्हापुरात त्यांचे राजकीय वजन आहे. कालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला आणि चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळवताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता असं म्हणत शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा

ईडी सोबत लढताना तोंडाला फेस येईल असे चंद्रकांत पाटलांनी सांगणे हा अंहकार आहे. आमची वर सत्ता आहे, आम्ही काहीही करु शकतो अशी भाषा पाटील यांनी यापूर्वी अनेकदा केली आहे. “केंद्रीय तपास यंत्रणांची हत्यारे चालवून आम्ही विरोधकांचे कोथळे काढू, बेजार करु” ही त्यांची नियत आहे आणि महाराष्ट्राच्या परंपरेला हा अहंकार शोभणारा नाही असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: