अहमदनगरसह “या” जिल्ह्यांनी सतर्क राहावे , आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन

0 674

पुणे –  राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव सध्या तरी कमी झाला आहे. मात्र राज्यातील काही जिल्ह्यात आता पर्यंत परिस्थिती नाजूकच आहे. अहमदनगरसह( Ahmednagar)   पुणे (Pune), मुंबई (Mumbai) या जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कधी कमी तर कधी जास्त होत आहे. यामुळे या जिल्हयांनी आणखी सतर्क राहण्याची गरज असल्याचे विधान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope) यांनी केले आहे.

सध्या राजेश टोपे हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. राजेश टोपे यांनी चाकणमधील एका खासगी रुग्णालयाला भेट दिली. आरोग्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

यावेळी राजेश टोपे म्हणाले की आजच्या तारखेला राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत अहमदनगर , पुणे, मुंबई , रत्नागिरी (Ratnagiri) याच जिल्ह्यांचा सत्तर टक्के वाटा आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केलंय. तसचे आपण लसीकरणावर जोर देऊयात त्यामुळे तिसऱ्या लाटेची दाहकता जाणवणार नाही, असंही राजेश टोपे म्हणालेत.

हे पण पहा – भरपावसात निलेश लंके यांची तुफान फटकेबाजी

Related Posts
1 of 1,672

पुण्यात सध्या 12 हजार 413 , सातारा जिल्ह्यात 6 हजार 328, मुंबईत 4 हजार 273, रत्नागिरी जिल्ह्यात 1 हजार 81 आणि अहमदनगरमध्ये 4 हजार 975 सक्रिय रुग्ण आहेत.  अहमदनगर जिल्ह्यात काल दि. 06 सप्टेंबर रोजी 884 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर नव्या 875 बाधितांची रुग्ण संख्येत झाली असून जिल्हयात  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.27 टक्के इतका आहे.

राज ठाकरेंनी लावलेल्या त्या आरोपांवर नवाब मलिक म्हणाले हायकोर्टाच्या आदेशाचा अभ्यास करावा

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: