……. म्हणून गृहमंत्रिपद नाकारलं’ जयंत पाटलांची कबुली , म्हणाले ….

0 252
सांगली – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्याचे गृहमंत्री पद नाकारलं असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना दिली होती.  यावर आता राज्याचे जलसंपदा मंत्री  जयंत पाटील यांनी देखली भाष्य केला आहे.  सांगलीतील पोलीस मुख्यालयातील नूतन इमारतीच्या उद्घाटन  प्रसंगी ते बोलत होते.     पाटील म्हणाले डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता आणि म्हणून मी गृहमंत्रिपद नाकारलं असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.(……. Therefore, the post of Home Minister was rejected ‘, confessed Jayant Patil, said ….)
Related Posts
1 of 1,640

गृहमंत्री झाल्यावर ब्लडप्रेशर आणि शुगरचा त्रास सुरू होतो, हे आपणाला आर आर आबा पाटील यांनी सांगितले होते, आणि गृहमंत्री झाल्यानंतर आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला. त्यांनतर आपण शुगर मागे लागू नये,अशी भूमिका घेतली असा खुलासा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच पोलिसांनी आता ज्यादा अधिकार देण्या बरोबर त्यांच्यावरील तणाव कमी करण्याचे प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मतही मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

नेमका काय म्हणाले अजित पवार

गृहखात्याच्या जबाबदारीवरून अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात जोरदार टोलेबाजी केली. ‘गृहखातं देत असताना अनेकांना विचारलं. त्यात जयंत पाटलांना साद घातली. पण गृहमंत्रिपद म्हटलं कि माझा बीपी वाढतो. आपल्याला अशा व्याधी होऊ नये म्हणजे बरं’ असं म्हणता अजितदादांनी चांगलीच फटकेबाजी केली.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील विविध वविकास कामांसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. यावेळी बोलत असताना अजितदादांनी गृहमंत्रिपदाची जबाबदारी कशा प्रकारे टाळली असा किस्साच सांगून टाकला.

धक्कादायक! हुंड्यासाठी विवाहितेचा खून, गुन्हा दाखल

‘गृहखातं देत असताना अनेकांना विचारलं. त्यात जयंत पाटलांना साद घातली. पण गृहमंत्रिपद म्हटलं कि माझा बीपी वाढतो. त्यानंतर ह जयंत पाटलांनी जबाबदारी ढकलली. नंतर ही जबाबदारी वळसे पाटलांनी स्वीकारलीत. आपल्याला अशा व्याधी होऊ नये म्हणजे बरं. असं म्हणत गृहमंत्रिपदावरून वळसेपाटलांसमोरच अजित पवारांची फटकेबाजी केली.(……. Therefore, the post of Home Minister was rejected ‘, confessed Jayant Patil, said ….)

हे  पण पहा –  शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या… | आ. मोनिका राजळे आक्रमक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: