.. म्हणूनच देवेंद्र फडणवीसांकडे जबाबदारी; रोहित पवारांचा राम शिंदेंना अप्रत्यक्ष टोला

0 304
.. Therefore responsibility to Devendra Fadnavis; Rohit Pawar's indirect attack on Ram Shinde

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

अहमदनगर –  राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने ‘मिशन- 2024’ अंतर्गत अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. यावरून कर्जत – जामखेडचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नाव न घेता माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांच्यावर टीका केली आहे.  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांची जबबादारी देण्यात आली आहे.

राम शिंदे यांच्याबद्दल बोलावं एवढे ते मोठे नाहीत : रोहित पवार
Related Posts
1 of 2,357

तर, यूपीएच्या अध्यक्षपदावरुन भाजप नेते राम शिंदे यांनी ‘ते काय महाराष्ट्रातील पद नाही की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षांनी शरद पवार यांच्या नावाचा ठराव मांडावा’ अशी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना राम शिंदे काही एवढे मोठे नेते नाहीत की, त्यांच्याबद्दल बोलावं. भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने यूपीए अध्यक्षपदाबाबत भाष्य केलेलं नाही, असा टोला आमदार रोहित पवार यांनी शिंदे यांना लगावला.

2024 साठी भाजपकडू मोर्चेबांधणी सुरु
2024 च्या निवडणुकीला तब्बल अडीच वर्ष शिल्लक असतानाच भाजपने प्रमुख डझनभर नेत्यांवर येणाऱ्या काळातील निवडणुकांसाठी दोन लोकसभा आणि बारा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली. भाजपची कोअर कमिटीच्या बुधवारी (30 मार्च) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात प्रत्येक नेत्याला दोन लोकसभा मतदारसंघ आणि बारा विधानसभा मतदारसंघाची मोर्चेबांधणी करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. येत्या 15 ते 30 एप्रिल दरम्यान डझनभर नेते संबंधित जिल्ह्यात प्रवास करतील. यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांची जबबादारी देण्यात आली आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला होता. तर याच वर्षाच्या सुरुवातीला कर्जत नगरपंचायत निवडणुकीत रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांनी निवडणूक लढत 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवत भाजपला धूळ चारली. राष्ट्रवादीला 12 आणि काँग्रेसला 3 जागा मिळाल्या. आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची झालेल्या या निवडणुकीत रोहित पवार यांनी बाजी मारली. त्यानंतर आता मिशन-2024 अंतर्गत राम शिंदे यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी न देता देवेंद्र फडणवीसांकडे दिल्याने रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या त्यांना टोला लगावला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: