हिवाळी अधिवेशनात मोठा गौप्यस्फोट होणार , नवाब मालिकांचा इशारा कोणाला ?

0 750
नवी मुंबई –   एनसीबी (NCB) चे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पथकाने छापा टाकून मुंबई मधील क्रुझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) समोर आणला होता. मात्र या प्रकरणात पंच असलेला प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने समीर वानखेडे यांच्यावर लावलेल्या लाचखोरीच्या आरोपामुळे या प्रकरणाला एक वेगळाच वळण मिळाले आहे. यातच  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री नवाब मलीक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन समीर वानखडे यांच्यासह एनसीबीवर टीका केली आहे. तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात (Maharashtra winter session)  एक मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे.  (There will be a big blast in the winter session, who will be warned by the Nawab Malik?)
त्यांनी आपल्या या पत्रकार परिषदेत म्हटले आहे कि विधानसभेत माझ्यावर जे काही आरोप होणार त्याचे उत्तर देताना जे काही मी समोर आणणार आहे. त्यामुळे या राज्यात त्यांना तोंड दाखवणं अवघड होणार आहे. अनेकांचा ड्रग्ज प्रकरणाची संबंध आहे. नेत्यांचे नाव आज मी घेत नाही. हिवाळी अधिवेशनात भाजपकडून माझे नाव घेऊन माझ्यावर हल्ले होणार आहेत. हिवाळी अधिवेशनात मोठी-मोठी नावे समोर येणार असं सूचक वक्तव्यही नवाब मलिकांनी केलं आहे.
Related Posts
1 of 1,635
 तर या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपा नेत्यांवर आरोप करत ते समीर वानखडे यांच्या संपर्कात असल्याचे देखील त्यानी म्हटले आहे. यावर बोलताना ते म्हणाले  मी जबाबदारीने सांगतो, काही भाजपचे नेते समीर वानखेडेला भेटतात आणि कालपासून त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. काशिफ खान हा कोन आहे याची जरा माहिती काढा. तो सेक्स रॅकेट, ड्रग्ज रॅकेट चालवतो आणि त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. रेव्ह पार्टी होणार हे माहिती असतानाही कारवाई नाही, क्रूझवर झाडाझडती नाही म्हणजे त्यांचे संबंध आहेत. काशिफ खानला अटक झाल्यावर अनेकांच्या चेहरे उघडे पडतील. काशिफ खानच्या माध्यमातून काय काय सुरू आहेत हे त्याची कसून चौकशी झाल्यावर उघड होईल.
समीर वानखडे यांच्या पती क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांच्या पत्रावर देखील नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हणाले . आम्ही मराठी आहोत आणि मराठी असल्याने आम्हाला मदत करा.’ नवाब मलिकांचा परिवार ही 70 वर्षांपासून महाराष्ट्रात आहे. नवाब मलिक याच राज्याचा एक नागरिक आहे. नवाब मलिक महाराष्ट्राचा नाहीये का? नवाब मलिक मराठी नाही का?
मुख्यमंत्र्यांना तुम्ही पत्र लिहिलं आहे पण मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे की कोणाला भेटायचं आणि कोणाला नाही. पण महाराष्ट्रातील कोणी म्हणत असेल की मी गुन्हा केलाय पण मी महाराष्ट्राचा असल्याने आम्हाला माफ करा तर आम्हाला वाटतं न्यायासमोर जात, धर्म, प्रांत काहीही नसतं. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे. (There will be a big blast in the winter session, who will be warned by the Nawab Malik?)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: