नागमठाण येथील व्यायाम शाळा चोरीला, तक्रार होताच १० चे १४ लाख परत

0 267

अहमदनगर –  कर्जत तालुक्यातील नागमठाण येथील व्यायामशाळा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .  एका नोंदणीकृत संस्थेकडून जिल्हा क्रीडा अधिकारी यांना खोटे कागदपत्रे सादर करून १० लाख रुपयांचे व्यायामशाळेचे बिल काढून घेतल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गावात कुठलीही व्यायाम शाळा नसल्याचे ग्रामसेवक सांगतात उलट त्यांनी तालमीसाठी क्रीडा अधिकाऱ्यांकडे प्रस्थाव पाठविला असल्याचे ते सांगत आहे. तर गावात या पूर्वीच्या काळात कधींही तालीम नव्हती आणि नाही आता ग्रामस्था म्हणताय गावातील तालीम चोरी झाल्याचे सांगत आहे. कर्जत तालुक्यातील तालुक्यातील नागमठाण राजमाता अहिल्यादेवी होळकर ग्रामीण विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या नावाने या संस्थेच्या आधारे नागमठाण येथील गट नंबर १८/१ मधील ०.२ मध्ये क्रीडा अधिकारी, नगर यांचेकडून निधी घेऊन. देविदास महारनवर याने दहा लाख खर्च करून बोगस व्यायाम शाळा करून घेतली आहे. देविदास महारनवर हे नागमठाण चे सरपंच आहेत सदर व्यायामशाळेत कोणतेही व्यायमाचे साहित्य नाही. महारनवर याने बोगस कागदपत्रे तयार करून जिल्हा क्रीडा अधिकारी यांना प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावामध्ये ग्रामपंचायत ठराव, बांधकाम परवाना, गावाचा महसुली दाखला आणि बिल काढण्यासाठी बोगस इमारतीचे फोटो काढून बिले उचलले आहे. ग्रामपंचायतीचे बोगस शिक्के आणि ग्रामसेवकाच्या बोगस सह्या करून करून शासनाची गावाची सुमारे १० लाखांची फसवणूक केली आहे. महारनवर हे नागमठाण ग्रामपंचायतीचे सरपंच असून त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी केली आहे. त्यांच्यावे कारवाई करण्याची मागणी होत आहे.

हे पण पहा –  मी नव्हे  तो पुन्हा येईल… ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. 

Related Posts
1 of 1,608

ग्रामपंचायतीच्या फोटोवर व्यायामशाळेचे नाव राजमाता अहिल्यादेवी होळकर ग्रामीण विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेने जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सादर केलेल्या प्रस्तावात व्यायाम शाळेचे फोटो देण्यात आले आहेत. प्रस्तावात दाखवलेल्या व्यायाम शाळेच्या इमारतीचा फोटो हा नागमठाण ग्रामपंचायतीचा असल्याचे दिसून आले आहे. ग्रामपंचायत इमारतीचा फोटो काढून त्यावर व्यायाम शाळेचे नाव टाकण्यात आले आहे. त्या सह्या माझ्या नाहीत व्यायामशाळा झालेल्या काळात ग्रामसेवक यांनी सांगितले. दरम्यान तक्रार झाल्या नंतर २०१५ -२०१६ साली व्यायामशाळेसाठी घेतलेले १० लाख्र रुपयांचे अनुदान नागमठाणचे सरपंच देविदास महानोर यांनी १३ लाख ९ हजार रुपये पुन्हा क्रीडा विभागाला भरले आहेत.

बहिणीची छेड काढल्याने भावांनी केली तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: