बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी कोट्यावधी रुपयांची चोरी; गुन्हा दाखल

प्रतिनिधी- DNA मराठी टीम
मुंबई – बॉलीवूडची (Bollywood) चर्चित अभिनेत्री पैकी एक असणारी अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर (Sonam Kapoor) होय. ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. नुकताच तिने त्याच्या चाहत्यांना एक गुड न्यूज शेअर केली होती. ती लवकरच आई होणार आहे. त्यानंतर ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. मात्र आता ती एक वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. सोनम आणि तिचा नवरा आनंद आहुजा (Anand Ahuja) यांच्या दिल्लीतील घरात करोडोंची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात दिल्लीमधील तुघलक रोड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दखल करण्यात आला आहे.
ही घटना फेब्रुवारी महिन्यातील सांगितली जात आहे जेव्हा सोनम कपूरच्या सासरच्यांनी तुघलक रोड पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने पोलिसांनी आत्तापर्यंत ही बातमी गुप्त ठेवली होती. मात्र आता हे प्रकरण समोर आले आहे. क्राइम टीम व्यतिरिक्त एफएसएल टीम पुरावे गोळा करण्यात गुंतलेली आहे. अद्यापपर्यंत आरोपींचा सुगावा लागलेला नाही.
समोर आलेल्या माहितीनुसार सोनम कपूरचे सासरे हरीश आहुजा, सासू प्रिया आहुजा आणि आनंद आहुजाची आजी सरला आहुजा दिल्लीतील अमृता शेरगिल मार्गावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये राहतात. या घरातून चोरट्यांनी १.४१ कोटींचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. सोनमच्या सासूने तुघलक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी तिच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की दिल्ली पोलीस २५ कर्मचारी, ९ केअरटेकर, ड्रायव्हर, माळी आणि इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहेत.