चक्क 124 गाढवांची चोरी, गुन्हा दाखल , किंमत ऐकूण पोलीसही चक्रावले

0 285

 बीड –  आपण दररोज लुटमार, घरफोडी, मंगळसूत्र, वाहन चोरीच्या घटना पाहतो किंवा ऐकतो मात्र कधी गाढव चोरीची (Donkey Theft) घटना पहिली किंवा ऐकली नाही. बीड जिल्ह्यात ही आगळीवेगळी घटना घडली आहे. जिल्हयातील परळी शहरात (Parli city) तब्बल  124 गाढवांची (Donkey) चोरी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 124  गाढवांची किंमत जवळपास  20 लाख (20 lakhs) असल्याची माहिती मिळाली आहे.  (Theft of 124 donkeys, filing of a crime, the total price of the police also went round)

ही घटना 25 ते 27 ऑक्टोबर दरम्यान रात्रीच्या सुमारास घडली आहे. शहर पोलीस ठाण्यात  34 गाढवांच्या मालकांनी धाव घेत आपली तक्रार नोंदवली आहे. शहरातील मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर, वैद्यनाथ मंदिर परिसर आणि नाथ चित्र मंदिर परिसरातून ही चोरी झाल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे. चोरीस गेलेल्या 124 गाढवांची बाजारभाव किंमत सरासरी प्रत्येकी 15 हजार सांगण्यात येत असून त्याची अंदाजे एकूण किंमत 20 लाखांच्या घरात आहे.

हे पण पहा – नाशिकच्या ‘ या ‘ भागात बिबट्याचा मुक्त संचार ( पहा व्हिडीओ )

Related Posts
1 of 1,486

या गाढवांवरच आमचा आणि आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असून आमच्यावर भविष्यात उपासमारीची वेळ येऊ शकते तेव्हा चोरीचा योग्य दिशेने तपास लावून आम्हाला न्याय द्यावा अशी एकमुखी मागणी केली आहे.  या तक्रारीमुळे आता पोलिसांची देखील पंचाईत झाली. मात्र या प्रकरणात तक्रारी प्रमाणे तपास सुरू आहे असं परळी शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी सांगितलं. (Theft of 124 donkeys, filing of a crime, the total price of the police also went round)

अभिनेत्री कतरिनाचा सलमान खानवर मोठा आरोप, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: